Sat, Jul 20, 2019 21:24होमपेज › Belgaon › बेळगाव : सीमाभागात हुतात्म्यांना अभिवादन 

बेळगाव : सीमाभागात हुतात्म्यांना अभिवादन 

Published On: Jan 17 2018 12:35PM | Last Updated: Jan 17 2018 12:35PM

बुकमार्क करा
निपाणी : प्रतिनिधी

बेळगावसह सीमाभागात संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. निपाणी येथे सीमालढ्यात हुतात्मा झालेल्यांना कोल्हापूरच्या महापौर स्वाती यवलुजे यांनी अभिवादन केले. यावेळी  सीमाभागातील मराठी भाषिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

भाषावार प्रांतरचना करताना बेळगावसह मराठी बहुभाषिक भाग अन्यायाने तत्कालीन म्हैसूर राज्यात डांबण्यात आला. त्यानंतर झालेल्या आंदोलनात पोलिसांच्या गोळीबारात बळी पडलेल्या हुतात्म्यांना आज सिमा भागात अभिवादन करण्यात आले.

सीमाप्रश्नासाठी लढणाऱ्यांवर १७ जानेवारी १९५६ या दिवशी पोलिस गोळीबार झाला होता. यात पै. मारुती बेन्‍नाळकर, मधू बांदेकर,महादेव बारागडी व लक्ष्मण गावडे आणि निपाणीत श्रीमती कमळाबाई मोहिते बळी पडले होते. 

वाचा : सीमावासीयांच्या जीवनातील काळाकुट्ट दिवस