कंग्राळी खुर्द : वार्ताहर
बाल हनुमान कुस्तीगीर संघटना कंग्राळी खुर्द यांच्यावतीने रविवार दि. 14 जानेवारी रोजी दुपारी 3 वा. अलतगा खडी मशीन येथील आखाड्यामध्ये जंगी कुस्त्यांचे भव्य मैदान आयोजित करण्यात आले आहे.
खास मकर संक्रांतीनिमित्त आयोजित या कुस्ती मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची कुस्ती पै. कातिंक काटे (कर्नाटक केसरी) वि. पै. सन्नी जॉन (सतपाल दिल्ली) यांच्यात, दुसर्या क्रमांकाची कुस्ती पै. सरदार सावंत (शाहू कुस्ती केंद्र, कोल्हापूर) वि. पै. शुभंम सिदनाळे (इचलकरंजी), पै. आप्पू तावशी (ता. दर्गा) वि. पै. विक्रम चव्हाण (जालंदर मुंडे आखाडा), पै. निशांत लहान कंग्राळी वि. सचिन बारगाळे (ता. इचलकरंजी), पै. अप्पासाब इंगळगी (ता. दर्गा) वि. पै. संतोष सुदरिक (ता. इचलकरंजी), पै. पृथ्वी (जालीधर मुंडे आखाडा) वि. पै. तुकाराम (अथणी ता. भांदूर गल्ली) यांच्यात लढत होणार आहे.
या प्रमुख कुस्त्यांसह इतर लहान - मोठ्या 50 कुस्त्या होणार आहेत. तरी कुस्तीप्रेमींनी या कुस्ती मैदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाल हनुमान कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष मोनेश्वर पाटील यांनी केले आहे.