Wed, Apr 24, 2019 15:31होमपेज › Belgaon › खासगी पॅ्रक्टिस करण्यास सरकारी डॉक्टरांना मुभा

खासगी पॅ्रक्टिस करण्यास सरकारी डॉक्टरांना मुभा

Published On: Jul 03 2018 1:51AM | Last Updated: Jul 02 2018 9:52PMजमखंडी : वार्ताहर

सरकारी इस्पितळात कार्यरत असणार्‍या डॉक्टरांनी काम संपल्यानंतर खासगी प्रॅक्टीस केल्यास सरकारची कोणतीच हरकत नाही. त्यासाठी निर्बंध नसल्याचे आरोग्यमंत्री शिवानंद पाटील यांनी सांगितले. 
बागलकोट येथे ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, सरकारी इस्पितळांमध्ये 357 पदांसाठी डॉक्टरांना अर्जाचे आवाहन करण्यात आले आहे. लवकरच त्यांचे कौन्सिलिंग होईल. चार विविध विभागांमध्ये त्यांची नेमणूक प्रक्रिया पार पडणार आहे. संबंधित विभागातच त्या भागातील डॉक्टरांचे कौन्सिलिंग होईल. पक्षाकडून आपल्याला हवे असलेले खाते मिळालेले नाही. त्यामुळे कोणतीच नाराजी नाही. आपल्या खात्याची जबाबदारी योग्यरित्या पेलण्याची क्षमता आहे. पद स्वीकारल्यानंतर तत्काळ खात्याच्या कामाला सुरवात केल्याचे त्यांनी सांगितले.

सिद्धरामय्यांनी अलिकडेच युती सरकारचे आयुष्य केवळ वर्षभरच असल्याचे भाकीत केले होते. त्याबद्दल बोलताना मंत्री पाटील यांनी एका वर्षानंतर त्यावर विचार करू, असे सांगितले. पक्षामध्ये कोणतेही मतभेद असतील तर ते पक्ष पातळीवर सोडविले जातील. त्यासाठी समन्वय समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. विजापुरातील काँग्रेस नेते एम. बी. पाटील यांना मंत्रीपद मिळाले किंवा मिळाले नाही तरी त्यांनी आपल्याला सहकार्य करणार असल्याचे कळविले आहे. गत सरकारमध्ये बागलकोट जिल्ह्याला दोन मंत्रीपदे मिळाली होती. युती सरकारच्या काळात विजापूरला हे भाग्य लाभण्याची शक्यता त्यांनी व्यक्‍त केली.