Sun, Feb 17, 2019 09:08होमपेज › Belgaon › इंधन दरवाढीविरोधात आज सरकारी बंद

इंधन दरवाढीविरोधात आज सरकारी बंद

Published On: Sep 10 2018 1:15AM | Last Updated: Sep 10 2018 1:15AMबंगळूर, बेळगाव : प्रतिनिधी

पेट्रोल, डिझेल, स्वयंपाक गॅस सिलिंडरचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याच्या विरोधात काँग्रेसने आज सोमवारी (दि.10) भारत बंद पुकारला आहे. बेळगावचे जिल्हाधिकारी एस. झियाउल्‍ला यांनी खबरदारी म्हणून सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

विविध राजकीय पक्षांसह संघटनांनी बंदला पाठिंबा दिला आहे. कर्नाटकात काँग्रेस-निजद आघाडी सरकार असल्याने हा सरकारी बंद ठरणार असून जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे.