Tue, Aug 20, 2019 05:18होमपेज › Belgaon › चिकोडी तालुक्यात मातृपूर्ण योजनेला चांगला प्रतिसाद

चिकोडी तालुक्यात मातृपूर्ण योजनेला चांगला प्रतिसाद

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

चिकोडी : काशिनाथ सुळकुडे     

गर्भवती व बाळंतीणींना अंगणवाडीतच पौष्टिक आहार पुरवून त्यांचे आरोग्य सुधारण्याच्या विधायक उद्देशाने राज्यात  2 ऑक्टोबरपासून राबवित असलेल्या मातृपूर्ण योजनेस चिकोडी तालुक्यात सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यात आजपर्यंत 16 हजार 63 गर्भवती व बाळंतीणींनी लाभ घेतला असून हे प्रमाण 80 टक्के इतके आहे.

शासनाच्या महिला ब बालकल्याण खात्याच्या शिशु अभिवृध्दी योजनेतून तालुक्यात 240 अंगणवाड्यांमधून मातृपूर्ण योजना राबविली जात आहे. या अंगणवाड्यामंध्ये कार्यरत 240 शिक्षक व 232 साहाय्यकांकडून मातृपूर्ण योजनेंतर्गत पौष्टिक आहार बनवून गर्भवती व बाळंतीणींना पुरविण्याचे काम होत आहे.

तालुक्यात शिशु अभिवृध्दी योजनेच्या 10 विभागांच्या व्याप्तीतील विविध गावांमध्ये 19,545 इतक्या गर्भवती व बाळंतीणी असून यापैकी 16 हजार 63 इतक्या महिला योजनेचा लाभ घेत आहेत. यात 17 हजार 320 गर्भवती असून 15 हजार 563 इतक्या गर्भवती मातृपूर्ण योजनेचा लाभ घेत आहेत. 2 हजार 205 बाळंतीण असून यातील 1500 महिला या योजनेतून पौष्टिक आहार घेत आहेत.    

आहार काय :  मातृपूर्ण योजनेतून प्रत्येक गर्भवतीला पौष्टिक आहार देण्यासाठी प्रत्येकी 21 रुपये दिले जाते. यानुसार सर्व अंगणवाड्यांना रेशन आहार पुरविला जातो. त्यानुसार अंगणवाडीत भात, सांबार, एक भाजी, शेंग लाडू-चिक्की, अंडी व दूध असा आहार बनवून तेथेच पुरविला जातो. गर्भवती झाल्याचे कळल्यापासून पुढे बाळंतपण झाल्यानंतर 6 महिन्यापर्यंत पौष्टिक आहार दिला जातो.