Wed, Jul 24, 2019 12:04होमपेज › Belgaon › दुर्मीळ उडणारा सोनसर्प चक्‍क लोकवस्तीत 

दुर्मीळ उडणारा सोनसर्प चक्‍क लोकवस्तीत 

Published On: Jan 10 2018 1:56AM | Last Updated: Jan 10 2018 12:01AM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

घनदाट  जंगलात शोधुनही न सापडणारा देशातील इतर सर्पांपेक्षाही अधिक वेगाने धावणारा आणि नामशेष होण्याच्या मार्गावर असलेला उडणारा सोनसर्प चक्क शहरातील टिळकवाडी परिसरात सापडला. महर्षी रोड टिळकवाडी येथील अजेय चौगुले यांच्या घराच्या आवारातील कुंड्याच्याखाली बसलेला सर्प निर्झरा चिट्टी यांनी पकडला. घराच्या आवारामध्ये अजय चौगुले हे स्वच्छता करीत असताना हा सर्प त्यांच्या नजरेस पडला. त्यांनी लागलीच आनंद चिट्टी यांना संपर्क साधून सदर सर्पाबद्दल माहिती दिली. आनंद चिट्टी यांनी सांगितले की, इतर सर्पांच्या तुलनेत हा सर्प अतिशय वेगाने धावतो. व तितकाच दुर्मिळही आहे. या सर्पाचे वैशिष्ठ म्हणजे उडण्याची क्षमता आहे. याला सोनसर्प या नावाने ओळखले जाते. सौम्य विषारी असणारा हा सर्प 5 फुटापर्यंत वाढतो. बेडूक, सरडे, पाली व छोटे पक्षी हे त्याचे प्रमुख भक्ष्य आहेत.

पंख नसतानाही ही हा सर्प उडतो कसा हा अनेकांच्या उत्सुकतेचा विषय आहे. झाडावर वास्तव्य करणारा हा सर्प एका झाडावरून दुसर्‍या झाडावर उडी  मारण्यासाठी जेव्हा आपले लांब व बारीक शरिर हवेत झोकून देतो. तेव्हा शरीर चेपटे सडपातळ करतो. (रिबनप्रमाणे) शरिरीचा खालील भाग पॅराशुटप्रमाणे आत घेतो. इच्छीतस्थळी  जाण्याकडे शरीर वळवितो. अशा प्रकारे एकावेळी 10 फुटापर्यंत उडी घेऊ शकतो. तर एका झाडावरून दुसर्‍या झाडावर शंभर मीटरपर्यंत लांब उडी शकतो. ताशि 12 कि.मी. धावणारा हा दुर्मिळ सोनसर्प आहे.