होमपेज › Belgaon › खानापुरात मानव बंधुत्व संघाच्या कार्यकर्त्यांची निदर्शने

सतीश जारकीहोळी यांना मंत्रिपद द्या

Published On: Jun 09 2018 1:33AM | Last Updated: Jun 08 2018 8:02PMखानापूर : वार्ताहर

माजी मंत्री आणि विद्यमान आमदार सतीश जारकीहोळी यांनी जिल्ह्यात काँग्रेस पक्षवाढीसाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे. विकासात्मक उपक्रम राबवून समाजातील जातीयता नष्ट करण्याबरोबरच अंधश्रध्दा निर्मूलनाचे कार्यदेखील केले आहे. त्यांना मंत्रिपद देऊन जिल्ह्याला न्याय द्यावा, अशी मागणी नगरसेवक लक्ष्मण मादार यांनी केली. शिवस्मारक सर्कलमध्ये रास्तारोको करुन मानव बंधुत्व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.

सतीश जारकीहोळी यांचे कार्य पाहता त्यांना मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता होती. मात्र, विस्तारामध्ये त्यांना डावलण्यात आले. यामुळे या नेत्यावर अन्याय झाला आहे. खानापूर तालुक्याच्या विकासात त्यांचा मोठा वाटा असल्याचे तालुका ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष अशोक अंगडी यांनी सांगितले.

यावेळी मल्लेशी पोळ, राजू नाईक, मारुती बिलावर, रोहित पोळ, इसाखान पठाण, अब्दुल कागजी, रोहित रजपूत, व्यंकटेश बादामी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.