Sun, Jun 16, 2019 02:10होमपेज › Belgaon › मराठी शाळेत कन्नड वर्ग भरवण्याचा घाट

मराठी शाळेत कन्नड वर्ग भरवण्याचा घाट

Published On: Jul 31 2018 1:30AM | Last Updated: Jul 30 2018 11:09PMबेळगाव : प्रतिनिधी

महाद्वार रोड येथील सरकारी आदर्श मराठी मुला-मुलींची शाळा क्र. 12 मध्ये फुलबाग गल्लीतील  सरकारी प्राथमिक कन्नड शाळा क्र. 7 विलीन करण्याचा घाट शिक्षण खात्याने घातला आहे. धोकादायक इमारतीचे कारण पुढे करून विलिनीकरणाच्या हालचाली सुरू आहेत. मात्र याला  पालक, एसडीएमसींचा तीव्र विरोध होत आहे. 

फुलबाग गल्लीतील सरकारी कन्नड शाळेची इमारत धोकादाय बनली आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेेसाठी शाळेचे स्थलांतर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शाळेत 140 विद्यार्थी अध्ययन करत आहेत. तेथे शेजारीच मराठी शाळा आहे. मात्र त्या शाळेतही विद्यार्थ्यांची संख्या समाधानकारक आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने महाव्दार  रोडवरील शाळेत स्थलांतर करण्याच्या हालचाली चालवल्या आहेत. 

कन्नड प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक यांनी आपली समस्या शिक्षण खात्यासमोर मांडली आहे. अळवण गल्ली येथील सरकारी मराठी मुलांची शाळा क्र. 19 वर्ग खोलीचे दोन कॉलम पडल्याने खोली धोकादायक बनली आहे. सदर घटना घडली त्यावेळी शाळेला सुट्टी होती. त्यामुळे अनर्थ टळला. पण, शाळेच्या वेळेत घटना घडली असती तर मोठा धोका होता. कन्नड शाळेत 140 विद्यार्थी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा धोका टाळण्यासाठी शाळा इमारतीचे काम हाती घेतले जाणार आहे. विद्यार्थ्यांची तूर्तास व्यवस्था केली जात आहे. 

एकदा शाळेत विद्यार्थी आल्यानंतर शिक्षण खाते इमारतीचे काम लवकर हाती घेईल का, असा प्रश्न विचारला जात आहे. शिक्षण खाते आता खडबडून जागे झाले आहे. बेळगाव शहरात अनेक धोकादायक इमारती आहेत. अनेक शाळांनी शंभरी गाठली आहे. शिक्षण खाते आता यमकनमर्डीची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेेसाठी शाळा स्थलांतर केली जात आहे.