Sun, Jan 20, 2019 15:11होमपेज › Belgaon › शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीत जर्मन दांपत्य

शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीत जर्मन दांपत्य

Published On: May 21 2018 1:11AM | Last Updated: May 21 2018 12:11AMबेळगाव : प्रतिनिधी

बेळगावच्या शिवजयंती मिरवणुकीचे अनेकांना आकर्षण असते. यामुळे मिरवणुक पाहण्यासाठी महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातील अनेक जिल्ह्यातून नागरिक येत असतात. यावेळी थेट जर्मनीतील एका दांपत्याने शिवजयंती मिरवणुकीत उपस्थिती दर्शवली. मिरवणुकीचे भव्य स्वरुप पाहून ते भारावून गेले होते.

शनिवारी सायंकाळी बेळगावातील शिवजयंती उत्सव मंडळाच्यावतीने चित्ररथ मिरवणूक काढण्यात आली. त्यावेळी बेळगाव भागाच्या दौर्‍यावर असलेल्या जर्मन दांपत्याने मिरवणुकीचा आस्वाद घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांचा आजपर्यंत इतिहास ऐकून आणि वाचून माहिती होता. मात्र चित्ररथ मिरवणुकीत प्रत्यक्ष सहभागी होवून धन्य होता आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

यावेळी कालिकादेवी युवक मंडळाचे कार्यकर्ते महेश पावले यांनी माहिती दिली. मंडळाच्यावतीने त्यांचा फेटा बांधून स्वागत करण्यात आले. यावेळी अंकुश केसरकर, गजानन निलजकर, सुनिल मुरकुटे, भाऊ किल्लेकर, अमोल केसरकर, धनंजय कणबरकर व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.