Sun, Mar 24, 2019 08:16होमपेज › Belgaon › कर्नाटकातील ३९ उत्पादनांना भौगोलिक चिन्ह 

कर्नाटकातील ३९ उत्पादनांना भौगोलिक चिन्ह 

Published On: Dec 01 2017 12:38AM | Last Updated: Dec 01 2017 12:04AM

बुकमार्क करा

बंगळूर : प्रतिनिधी

कर्नाटकातील 39 उत्पादनांना भौगोलिक दर्जाचे चिन्ह मिळालेले आहे. त्यामध्ये म्हैसूरच्या रेशीमला, धारवाडच्या पेढ्यांना, कुर्गमधील ग्रीन मसाल्याला व अप्पेमिडी आंब्यांचा समावेश आहे.

भौगोलिक दर्जा चिन्ह ताज्या अहवालानुसार व केंद्रीय व्यापार व उद्योग खात्यातर्फे नोंदणी केल्याप्रमाणे आतापर्यंत 301 भारतीय उत्पादनांना एप्रिल 2004 पासून 301 उत्पादनांना भौगोलिक दर्जा चिन्ह मिळालेले आहे. कर्नाटकातील 19 हस्त कौशल्यांना, 16 कृषी विषयक उत्पादनांना, तीन उत्पादनांना तर एक खाद्य उत्पादनाला भौगोलिक दर्जा चिन्ह (जी.आय.) मिळालेले आहे. महाराष्ट्रातील 29 उत्पादनांना तर उत्तर प्रदेशमधील 25 व केरळमधील 24 उत्पादनांना भौगोलिक दर्जा चिन्ह प्रदान केलेले आहे.

अलीकडेच कर्नाटकातील गुळेदगुड खन्‍ना लॅबिकला चोळी व ब्लाऊज उत्पादनाला मिळालेले आहे. हे उत्पादन गुळेदगुड व बागलकोट येथे घेतले जाते. त्याचप्रमाणे बंगळूरमधील निळ्या द्राक्षांना, बंगळूरमधील गुलाबी कांद्याला, कोप्पळ जिल्ह्यातील किनहाळ येथील ऐतिहासिक लाकडी खेळण्यांना व उडुपीमधील साडीला हे जी.आय. दर्जा चिन्ह मिळालेले आहे. 

जी.आय.मुळे केवळ उत्पादनाला दर्जाच प्राप्त होत नाही तर त्यामुळे राज्याची सांस्कृतिक व जैववैविधता स्पष्ट होते. कर्नाटकाने विविध स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने जास्तीत जास्त उत्पादनांना जी.आय. दर्जा चिन्ह प्राप्त केलेले आहे. आणखी तीस ते चाळीस उत्पादनांना जी.आय. चिन्ह प्राप्त होणार असून ती उत्पादने प्रतीक्षेत आहेत. म्हैसूरचा पाक, बेळगावचा पेढा, कुंदा, गोकाकचा कर्दंट व सवनूर काराला खाद्यपदार्थांमध्ये जी. आय. चिन्ह मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे.