Tue, Mar 19, 2019 03:15होमपेज › Belgaon › मनपा सर्वसाधारण बैठक 27 रोजी ?

मनपा सर्वसाधारण बैठक 27 रोजी ?

Published On: Jan 17 2018 1:56AM | Last Updated: Jan 16 2018 11:11PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

काही सदस्य परगावी गेल्यामुळे मंगळवारी होणारी लेखा स्थायी समितीची बैठक लांबणीवर पडली आहे. मनपाची सर्वसाधारण बैठक 27 जानेवारी रोजी घेण्याच्या हालचालींना वेग आला आहे. अंदाजपत्रकासंदर्भात मंगळवारी लेखा स्थायी समितीची बैठक घेण्याचे निश्‍चित झाले होते. मात्र काही कारणास्तव बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. स्थायी समितीच्या अध्यक्षा सरला हेरेकर यांच्याशी बैठकीसंदर्भात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. सदस्य रतन मासेकर यांनी बैठक लांबणीवर पडल्याचे सांगितले.

महापालिकेच्या अंदाजपत्रकाबाबत लेखा अधिकार्‍यांनी मंगळवारी चर्चा केली. अंदाजपत्रकातील जमा-खर्च ताळमेळबाबत अधिकारी बैठकीत गुंतले होते. मार्चमध्ये महापौर, उपमहापौर निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी सर्वसाधारण बैठकीतून विविध विषयांना मंजुरी मिळविण्याबाबत महापौर संज्योत बांदेकर यांनी प्रयत्न चालविले आहेत. 27 रोजी मनपाची सर्वसाधारण बैठक बोलाविण्याची तयारी त्यांनी केली आहे. मात्र विषयपत्रिकेबाबत चर्चा झाली नसल्याचे कळते.