Fri, Apr 26, 2019 03:23होमपेज › Belgaon › चिखले येथील गावडेची एसआयटी चौकशी

चिखले येथील गावडेची एसआयटी चौकशी

Published On: Sep 03 2018 1:38AM | Last Updated: Sep 03 2018 12:16AMबेळवाग/ जांबोटी : प्रतिनिधी

पुरोगामी पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) चिखले (ता.  खानापूर) येथील विठोबा गावडे याला चौकशीसाठी बंगळूरला बोलावून त्याच्याकडून माहिती घेतली.

बेळगावातील संशयित भरत कुरणे याच्या शेतात अनेकांनी शस्त्र प्रशिक्षण घेतले. हत्येनंतर तेथे पार्टीही झाल्याची चर्चा आहे. त्या ठिकाणी याआधी रिसॉर्टही होते. विठोबा गावडे तेथे काम करत होता. नेहमी त्या ठिकाणी ये-जा करणार्‍यांची माहिती एसआयटीने घेतली. कुरणेला अटक केल्यानंतर एसआयटीने अनेकदा बेळगावात येऊन चौकशी केली.  
गावडेंची पहिली चौकशी जांबोटीत, दुसरी खानापुरात  आता तिसरी बंगळुरात केली. काही दिवसांपूर्वी त्याच्या घरीही एसआयटीने तपास केला.

 कुरणेसह  गौरी लंकेश यांचे मारेकरी केव्हा आले होते?  चिखलेतील पार्टी खून झाल्यानंतरकेली की त्याआधी? असे प्रश्‍न गावडे याला विचारण्यात आल्याचे सूत्रांनी संगितले. लंकेश यांचा खून होण्याआधी त्या काळात दोनवेळा सहा जण रिसॉर्टवर बराच वेळ थांबले होते. पण, सायंकाळी पाचनंतर गावडे घरी  जात असल्याने  रिसॉर्टमध्ये काय झाले, याची अधिक माहिती नसल्याचे गावडे याने एसआयटीला सांगितल्याचे सूत्रांकडून कळाले आहे. 

सागरला चौकशीनंतर सोडले

ज्योतीनगर गणेशपूरचा रहिवासी सागर लाखेकडून विविध माहिती घेतल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले. भरत कुरणेच्या ढाब्यावर तो लॉन घालण्याचे काम करीत होता. शिवाय तो मल्‍लखांब प्रशिक्षक आहे. कुरणेच्या रिसॉर्टवर तो जात होता. त्यामुळे त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.यापूर्वी जांबोटी,

खानापुरात दिलेली माहितीच बंगळुरात दिली. तासभर अनेक प्रश्‍न एसआयटीकडून विचारण्यात आले.
- विठोबा गावडे