Sun, Jul 21, 2019 12:42होमपेज › Belgaon › बेळगाव, हुबळीत तपास

बेळगाव, हुबळीत तपास

Published On: Aug 22 2018 12:54AM | Last Updated: Aug 22 2018 12:32AMबेळगाव : प्रतिनिधी

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपासणी पथक (एसआयटी) दोन दिवसांपासून बेळगावात तळ ठोकून आहे. मंगळवारी ‘कोका’अंतर्गत अटक करण्यात आलेल्या बेळगाव येथील भरत कुरणेची एसआयटीने जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून अधिक माहिती घेतली. शिवाय, परिवहन मंडळाचे वाहक आणि चालकांचा या प्रकरणाशी काय संबंध, याचाही तपास चालवला आहे. मंगळवारी हुबळीतही तपास करण्यात आला.

राजाजीनगर-बंगळूरचे पीएसआय श्रीधर पुजारी यांच्या नेतृत्त्वाखाली एसआयटी बेळगावात तीन दिवसांपासून आहे. मंगळवारी बेळगाव आणि हुबळीतही तपास करण्यात आला. एसआयटीने कुरणे याच्या चिखले (ता. खानापूर) येथील शेतवडीत तपास केला. रविवारी व सोमवारी असे दोन दिवस या भागात तपास करण्यात आला आहे. चिखले येथील काही नागरिकांची ही चौकशी करण्यात आली आहे. भरत कुरणेचा भाऊ राहुलकडेही चौकशी करण्यात आली. 

याप्रकरणी तपास अधिकार्‍यांनी पिस्तूल प्रशिक्षणासंबंधीचे पुरावे मिळविण्यावरच लक्ष केंद्रीत केल्याचे सांगण्यात येत आहे. एसआयटीने रविवारी दिवसभर तपास करून याच परिसरातील विश्रामगृहात मुक्‍कामाला होते. तर सोमवारी पुन्हा दिवसभर तपास केला आहे. जांबोटी भागातील इतर भागालाही भेट देउन पाहणी केली. मंगळवारी सकाळी 11.10 वाजता एसआयटीने  बेळगाव जिल्हा इस्पितळात  भरत कुरणेची वैद्यकीय तपासणी करवून घेतली. त्यावेळी एसआयटीचे 8 अधिकारी उपस्थित होते. 

बेळगाव परिसरावर नजर 

एसआयटी पथकाने भरत कुरणेला 8 ऑगस्ट रोजी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याच्यावर कोका कायद्याखाली गुन्हा दाखल करुन बेळगावला चौकशीसाठी आणण्यात आले आहे. या प्रकणाशी बेळगाव परिसरातीलच आणखी दोघांचा पोलिस शोध घेत आहेत.