Sat, Nov 17, 2018 03:41होमपेज › Belgaon › गौरी लंकेश हत्या : बंगेराने पुरवली शेकडो काडतुसे

गौरी लंकेश हत्या : बंगेराने पुरवली शेकडो काडतुसे

Published On: Aug 04 2018 1:32AM | Last Updated: Aug 03 2018 10:55PMबेळगाव : प्रतिनिधी

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी सरकारी कर्मचारी असणार्‍या राजेश बंगेरा (वर 50) याला अटक केल्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली असून, त्याने गेल्या सहा वर्षांत .32 आणि 7.65 एम.एम.ची शंभरपेक्षा अधिक काडतुसे मडिकेरी येथून विकत घेतली होती. तसेच  ही काडतुसे त्याने काही संघटनांना दिल्याचे तपासात दिसून आले आहे. परशुराम वाघमारे, गणेश मिस्कीनसह अनेक युवकांना त्याने पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण दिल्याचे समजते.

दरम्यान, के. टी. नवीनकुमारला अटक केल्यानंतर इतर संशयितांनी दावगणगेरीत बैठक घेतली होती. साहित्यिक प्रा. के. एस. भगवान यांच्या हत्येबाबत त्यांनी तेथे चर्चा केल्याचे विशेष  तपास पथकाच्या (एसआयटी) चौकशीत उघडकीस आले. अमोल काळे, अमित दिगवेकर, मनोहर येडवे हे दावणगेरीत भेटले. भगवान यांची हत्या करण्यासाठी काही युवकांना बोलावून आणण्याचे संशयित प्रवीण याने सांगितले होते. त्यानुसार तेथे गेल्याची कबुली अमित याने उप्पारपेठ पोलिसांना दिली होती.

नवीनकुमारला अटक झालेली माहिती निहाल ऊर्फ दादा याने दिली. काही दिवस भूमिगत राहण्याची सूचना त्याने केली. त्यानुसार काही दिवस भूमिगत राहिल्यानंतर अमोल काळेने दावणगेरीला जायचे असल्याचे सांगितले. त्यानुसार मनोहर, अमित आणि अमोलने कारने दावणगेरी गाठले. पोलिसांना याचा सुगावा लागला आणि प्रवीणची वाट पाहात उभारलेल्या तिघांना अटक करण्यात आली.