Tue, Apr 23, 2019 01:35होमपेज › Belgaon › यहाँ अंमल करना मना है !

यहाँ अंमल करना मना है !

Published On: Jan 05 2018 1:05AM | Last Updated: Jan 04 2018 8:35PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

कॅण्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत  प्रशासनाकडून आठ दिवसापूर्वी ‘यहाँ कुडा  फेकना सक्त मना है’ या आशयाच्या फलकांची उभारणी करण्यात आली होती. मात्र, फलकाच्या समोरच कचरा टाकला जात असल्याने ‘यहाँ अंमल करना मना है’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.  

कॅण्टोन्मेंट हद्दीत नागरिकांकडून वारंवार कचरा टाकण्यात येत होता. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्‍न निर्माण झाला होता. याची दखल घेत येथे कचरा टाकू नये अशा अशायाच्या फलकाची उभारणी केली. मात्र, नागरिकांकडून याबाबत अंमलबजावणी होताना दिसत नाही.  

दि. 27  रोजी फलक उभारणीवेळी कॅण्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यकारी अधिकारी दिव्या शिवराम, बोर्डाचे उपाध्यक्ष साजिद शेख, सदस्य अल्लेदिन किल्लेदार, रिझवान बेपारी, अरेबिया धारवाडकर, स्वच्छता निरीक्षक नागेश साखे आदी  उपस्थित होते. 

शहरातील यंदे खुट आणि युनियन जिमखाना परिसरात फलक उभारले. असून कार्यक्षेत्रात विविध ठिकाणी 21 पेक्षा अधिक फलकांची उभारणी करण्यात आली आहे. मात्र, युनियन जिमखाना परिसरातील फलकाच्या समोरच कचरा टाकण्यात आल्याने आश्‍चर्य करण्यात येत आहे. 

कॅण्टोन्मेंट बोर्ड परिसरातील कचर्‍याची समस्या दिवसेंदिवस जटिल होत चालली आहे. या परिसरातील नागरिकांकडून उघड्यावर कचरा टाकण्यात येतो. तसेच वारंवार जाळण्याचे प्रकार देखील घडतात. कचरा टाकण्यार्‍यांवर बोर्डाने अनेकवेळा कारवाई करून देखील नागरिकांकडून कचरा टाकला जातो. यासंबंधी फलक उभारून जागृती करूनही कचरा टाकला जात आहे. यामुळे कॅण्टोन्मेंट बोर्डाने ठोस उपाययोजना आखण्याची गरज निर्माण झाली आहे.