Wed, Jun 26, 2019 12:07होमपेज › Belgaon › गणेशोत्सव मंडळांची ‘बाँड’ अट शिथिल

गणेशोत्सव मंडळांची ‘बाँड’ अट शिथिल

Published On: Sep 09 2018 2:11AM | Last Updated: Sep 09 2018 2:11AMबेळगाव : प्रतिनिधी

शहरातील गणेशोत्सव मंडळांना परवाना देण्यासाठी पोलिस खात्याकडून 20 रुपयांचा बाँड व कार्यकर्त्यांचे फोटो देण्याची अट घालण्यात आली होती. मात्र, महामंडळाने मंडळांची जबाबदारी घेण्याची हमी दिल्याने ही अट पोलिस आयुक्तांनी शिथिल केली आहे. महामंडळाने पोलिस आयुक्त डी. सी. राजाप्पा यांची भेट घेऊन समस्या मांडल्या. 

मंडळांना विविध प्रकारचे परवाने देण्यासाठी पोलिस प्रशासनाने 20 रुपयांचा बाँड आणि मंडळाचे अध्यक्ष, तसेच सचिवांचे फोटो देण्याची अट घातली होती. याबाबत मंडळांनी महामंडळाकडे नाराजी व्यक्त केली होती. त्यानुसार महामंडळाच्या पदाधिकार्‍यांनी राजाप्पा यांची भेट घेऊन समस्या मांडल्या. आयुक्तांनी  पदाधिकार्‍यांशी चर्चा केली.

महामंडळ  शहरातील मंडळांची जबाबदारी घेत असेल तर सदर अट शिथिल करू, असे आश्‍वासन दिले. याबाबत शहर स्थानकांंच्या पोलिस अधिकार्‍यांना याची माहिती देऊ, असे राजाप्पा यांनी सांगितले. 
महामंडळाचे कार्याध्यक्ष रमाकांत कोेंडुसकर, उपाध्यक्ष रणजित-चव्हाण पाटील, सचिव शिवराज पाटील, जनसंपर्कप्रमुख विकास कलघटगी, गणेश दड्डीकर, सागर पाटील, शहापूर गणेश महामंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव, अशोक चिंडक, बाळासाहेब काकतकर, राजेंद्र हंडे, शेखर हंडे, अनंत पाटील आदी उपस्थित होते.