Sat, Nov 17, 2018 19:12होमपेज › Belgaon › जागेच्या वादातून घराची भिंत पाडली

जागेच्या वादातून घराची भिंत पाडली

Published On: Dec 01 2017 12:38AM | Last Updated: Dec 01 2017 12:00AM

बुकमार्क करा

खानापूर : प्रतिनिधी

शिवाजीनगर वसाहतीमधील जागेच्या वादात असलेल्या एका घराची भिंत पाडून कुटुंबाला मारहाण केल्याची तक्रार काल पोलिसांत रात्री उशिरा दाखल करण्यात आली. पोलिसांनी 2 महिलांसह सहा जणांना ताब्यात घेतले.

रामगुरवाडी ग्रा. पं. च्या हद्दीत येणार्‍या शिवाजीनगर पहिला क्रॉस येथे अल्लोळकर शिक्षकाचे घर आहे. घराच्या जागेवरून वाद आहे. बेळगावमधील एकाने जागेवर आपला हक्‍क सांगून अल्लोळकर कुटुंबाला घर रिकामे करण्यासाठी तगादा लावला होता. काल सायंकाळी चार जणांनी घराची समोरील भिंत पाडण्यास सुरुवात केली.

त्यांना अडविण्यास गेलेल्या अल्लोळकर कुटुंबीयांना मारहाण करून शिवीगाळ करण्यात आल्याची तक्रार पोलिसांत करण्यात आली. या प्रकरणी दोन महिलांसह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. 
यामध्ये प्रवीण पतकी, जगन्‍नाथ पाटील, संदेश माहुले, विलास चौगुले, सुधा बसरीकट्टी, दीपा पाटील यांचा समावेश आहे.