Thu, Jun 20, 2019 00:32होमपेज › Belgaon › चार चोरट्यांना अटक

चार चोरट्यांना अटक

Published On: Jan 02 2018 12:58AM | Last Updated: Jan 01 2018 11:38PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी      

तुमकूर येथील घाऊक फूल व्यापारी नारायणप्पा यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून त्यांच्याकडील 24 लाख रु. रोकड लांबविण्यात आली होती. याप्रकरणी गुन्हा अन्वेषण पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. चोरट्यांकडून 24 लाखांपैकी 12 लाख 40 हजार रुपयांसह दोन धनादेश, तसेच दोन दुचाकी जप्‍त करण्यात आल्या असल्याची माहिती उत्तर विभागाचे पोलिस महासंचालक व प्रभारी पोलिस आयुक्तक्‍त एस. रामचंद्रराव यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

यावेळी पुढे बोलताना रामचंद्रराव म्हणाले, नारायणप्पा फूल व्यापारासाठी बेळगावला येत असत. हुक्केरी येथील अस्कर अली नझीर अहमद मकानदार (वय 21) याला नारायणप्पा यांच्या बड्या व्यवहारांची माहिती होती. नारायणप्पा हुक्केरीला व्यापाराच्या वसुलीसाठी जात असत. याची अस्करअलीला कल्पना होती.

पाळत ठेवून लूट

बेळगाव : प्रतिनिधी    

अस्करने आपले साथीदार निसार मुल्ला, उमेश बस्तवाडे यांच्यासोबत  नारायणप्पा याना लुटण्याचा बेत आखला. नारायणप्पा गेल्या महिन्यात    बेळगावाला आले असता अस्करने त्यांच्यावर पाळत ठेवली.नारायणप्पा हुक्केरीला आले असता अस्करने त्यांचा बेळगावपर्यंत पाठलाग केला.दरम्यान, शशिकांत मिसाळे व यल्लेेश मानुगोळ (रा.सुळेभावी) यानेही नारायणप्पा यांच्यावर पाळत ठेवली होती.

हुक्केरीहून बेळगावला आलेले नारायणप्पा तुमकूरला जाण्यासाठी निघाले. राष्ट्रीय महामार्गावर बसमध्ये चढत असताना नारायणप्पा यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांच्याकडील 24 लाख रु.लांबविण्यात आले. नारायणप्पा याना लुटण्यासाठी अस्करअली याने नियोजनबध्दरित्या बेत आखला होता.अस्करने आपल्या साथीदारांसह  नारायणप्पा यांची लूट केली. फूल व्यापार्‍यास 24 लाख रु.ला लुटल्याने पोलिस खाते चक्रावले होते. सदर प्रकरणी माळमारुती पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली.लूटप्रकरणी तपासाची जबाबदारी गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आली. गुन्हे अन्वेषण पोलिस निरीक्षक ए.एस.मोदीकोप्प, मंडल पोलिस निरीक्षक डी.आर.मुत्नाळ यानी या लूट प्रकरणाचा सखोल तपास चालविला होता.

नारायणप्पा याना लुटणारे त्यांचे माहिगार असावेत, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला होता.याचबरोबर राष्ट्रीय महामार्गाशेजारील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे फूटेज तपासण्यात आले होते. नारायणप्पा यांचे कुणाशी व्यवहार होतात याचीही पोलिसांनी माहिती घेतली. त्यावेळी लूट प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हुक्केरी येथील अस्करअली असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर अस्करअली याला ताब्यात घेण्यात आले. कसून चौकशी केल्यानंतर  अस्करअली याने फूल व्यापार्‍याची सहकार्‍यांसह लूट केल्याची कबुली दिली.

अस्करअलिने दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी इतर दोघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या चोरट्यांकडून 12 लाख, 40 हजार रु. रोख, दोन धनादेश जप्त करण्यात आले असल्याचे रामचंद्रराव यानी स्पष्ट केले. यावेळी पोलिस उपायुक्त सीमा लाटकर व अमरनाथ रेड्डी यानी पोलिस पथकाचे अभिनंदन केले.