Tue, Sep 25, 2018 14:29



होमपेज › Belgaon › जिल्हा पंचायतीत ‘मराठी’ला स्थान

जिल्हा पंचायतीत ‘मराठी’ला स्थान

Published On: Jul 24 2018 1:07AM | Last Updated: Jul 23 2018 11:54PM



बेळगाव : प्रतिनिधी

जिल्हा पंचायतीच्या पाचपैकी चार समित्यांचे अध्यक्षपद मराठी भाषिकांना देण्यात आले आहे. तर दोन समित्यांवर म. ए. समिती सदस्यांची वर्णी लागली आहे. जि. पं. स्थायी समित्यांची निवड सोमवारी बिनविरोध करण्यात आली. निवड प्रक्रियेत मंत्री रमेश जारकीहोळी यांनी महत्त्वाची भूमिका बजावत सर्वपक्षीय सदस्यांना संधी दिली. 

येळ्ळूर जि. पं. सदस्य रमेश गोरल यांची शिक्षण आणि आरोग्य स्थायी समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. अर्थ लेखा स्थायी समिती अध्यक्षपदी जि. पं. अध्यक्षा आशा ऐहोळे, सामान्य स्थायी समिती अध्यक्ष जि. पं. उपाध्यक्ष अरुण कटांबळे, सामाजिक न्याय स्थायी समिती अध्यक्षपदी शैलजा कागे तर कृषी आणि औद्योगिक स्थायी समिती अध्यक्ष शंकर माडलगी  यांची निवड करण्यात आली.

स्थायी समितीमध्ये भाजपच्या दहा, निजद एक, तर सताधारी काँग्रेसच्या 22 सदस्यांना संधी मिळाली. चार महिन्यांपासून प्रलंबित असणारी जि. पं. स्थायी समित्यांची निवड प्रक्रिया सोमवारी जि. पं. सभागृहात राबविण्यात आली.