Tue, Apr 23, 2019 01:40होमपेज › Belgaon › युवक अपहरण प्रकरणी आणखी चौघांना अटक

युवक अपहरण प्रकरणी आणखी चौघांना अटक

Published On: Jan 09 2018 1:32AM | Last Updated: Jan 08 2018 11:01PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

सुळेभावी येथील 19 वर्षीय युवक नागराज बसवराज परीट (वय19 रा. सुळेभावी) याच्या अपहरण प्रकरणी मारिहाळ पोलिसानी तपासाला वेग दिला असून आणखी चौघांना सोमवारी अटक केली. 
अपहरण करण्यासाठी मदत केल्याप्रकरणी नागेश सुरेश मिसाळे (वय28), रवि केदार मिसाळे (23), लक्ष्मण भिमसी हणबरट्टी (20), राघवेंद्र तुकाराम कंबार ( 23, सर्वजण रा.सुळेभावी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

शनिवारी सुळेभावी येथून नागराजचे अपहरण करण्यात आले होते. या संबंधी सदर युवकाने मारीहाळ पोलिस स्थानकात दाखल केलेल्या तक्रारीनुसार रविवारी मारिहाळ पोलिसांनी पाचजणांना अटक केली होती. आजच्या अटकेने एकूण संशयितांची संख्या 9 वर पोचली आहे . आर्थिक व्यवहारातुन शनिवारी सायंकाळी नागराजचे अपहरण करण्यात आले होते.