Tue, Jul 16, 2019 10:14होमपेज › Belgaon › अपघातात गोव्याचे चौघे जखमी

अपघातात गोव्याचे चौघे जखमी

Published On: Dec 03 2017 1:09AM | Last Updated: Dec 02 2017 11:11PM

बुकमार्क करा

निपाणी : प्रतिनिधी 

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कोगनोळी येथील आरटीओ ऑफिस कार्यालयासमोर शनिवारी मध्यरात्री 1 च्या सुमारास गोव्याहून मुंबईकडे निघालेल्या कारचा टायर फुटल्याने अपघात झाला. यामध्ये म्हापसा येथील चौघेजण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर कोल्हापूर येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

म्हापसा येथील रहिवासी सुभाष नारायण दारगलकर (वय 55) हे कारमधून गोव्याहून मुंबईकडे जात होते. कार कोगनोळी आरटीओ ऑफिससमोर आली असता वेगात असलेल्या कारचा पुढील डाव्या बाजूचा टायर फुटला. यावेळी चालक सुभाष यांचा ताबा सुटल्याने कार रस्ता दुभाजकावर जोरात आदळीत पलटी झाली. यावेळी कारमधील सुभाष यांच्यासह उषा दीपक दारगलकर (वय 55), सन्वीक दीपक दारगलकर (वय 26), अक्षय दीपक दारगलकर (वय 19) हे गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच पुंजलॉईडच्या भरारी पथकाचे निरीक्षक एम. आर. घाटगे, कोगनोळी आऊट पोस्टचे सहाय्यक फौजदार एम. आर. अंची, हवालदार एन. एस. सगरेकर, के. एस. दड्डी यांनी धाव घेत जखमींना उपचारासाठी कोल्हापूरच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले. पुढील तपास ग्रामीणचे स्थानकाचे फौजदार निंगनगौडा पाटील करत आहेत.