Thu, Jul 18, 2019 00:31होमपेज › Belgaon › बेपत्ता गणेशचा मृतदेह गायरीत

बेपत्ता गणेशचा मृतदेह गायरीत

Published On: Jun 03 2018 1:20AM | Last Updated: Jun 03 2018 1:20AMबेळगाव : प्रतिनिधी

पाच दिवसांपासून बेपत्ता असलेला वडगाव मलप्रभानगर येथील बालक गणेश होसमनी (वय 7) याचा मृतदेह पोटेमळा येथील गोबर गॅसच्या गायरीत सापडला. या प्रकरणी शहापूर पोलिस स्थानकात अपहरण झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. 

गणेश बेपत्ता झाल्यानंतर त्याची पोटेमळा येथील पडक्या विहिरीत शोधाशोध करण्यात आली होती. मात्र, तेथेही त्याचा पत्ता लागला नाही. या परिसरात उपलब्ध असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधूनही शोध घेण्यात येत होता. तो विहिरीच्या दिशेने गेल्याचे  निदर्शनास आले होते. मात्र या परिसरात असणार्‍या गायरीकडे कोणाचेच लक्ष गेले नव्हते. तेथेच खेळताना गणेश पाय घसरून पडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गणेशच्या पश्चात आई, वडील असून ते विणकर आहेत. 

घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला. नंतर त्या बालकाचा मृतदेह शवचिकित्सेसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. मृतदेह गायरीमध्ये सापडल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी तेथे मोठी गर्दी केली होती. त्यांचेही डोळे पाणावले होते.