होमपेज › Belgaon › काँग्रेसमुळेच राज्याचा भरीव विकास

काँग्रेसमुळेच राज्याचा भरीव विकास

Published On: Dec 22 2017 1:25AM | Last Updated: Dec 21 2017 11:52PM

बुकमार्क करा

सौंदलगा : वार्ताहर 

मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी शेतकर्‍यांना कर्जमाफी करून त्याची तत्काळ अंमलबजावणी केली. काँग्रेस सरकारनेच राज्याचा भरीव विकास केल्याचे प्रतिपादन केपीसीसी उपाध्यक्ष माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी केले. येथील सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी परशराम बोरगुंडे होते. स्वागत व प्रास्ताविक प्रभाकर आरेकर, शशिकांत पाटील यांनी केले. 

प्रा. सुभाष जोशी म्हणाले, समाजकारण, राजकारण करत असताना शत्रू निर्माण केले नाहीत. कोणाचाही वैयक्‍तिक द्वेष केला नाही. कोणताही पक्षभेद, जातभेद न मानता सर्वांची कामे केली. काँग्रेसमुक्‍त मतदारसंघ करण्यापेक्षा विरोधक मुक्‍त करण्यासाठी खटपट सुरू आहे.  

माजी आम. काकासाहेब पाटील म्हणाले, सरकारने पेन्शन योजनांच्या मंजुरीपत्रांचे वितरण होत असून त्यांचा सवंग प्रसिध्दीसाठी वापर केला जात आहे, ते दुर्दैवी आहे. लक्ष्मणराव चिंगळे म्हणाले, काँग्रेसने देशाच्या समग्र विकासासाठी असंख्य योजना राबवल्या. कर्नाटक देशात अव्वल असून सिध्दरामय्या सरकारने निवडणुकीत दिलेली आश्‍वासने पूर्ण केली आहेत. 

नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर,  निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, ग्रा. पं. सदस्य दिलीप शेवाळे, मारुती कोळेकर, उत्तम पाटील, पंकज पाटील यांनी मनोगत व्यक्‍त केले. सौंदलगा काँग्रेस उपाध्यक्षपदी बबन मेस्त्री यांच्या निवडीची घोषणा वीरकुमार पाटील यांनी केली.

कार्यक्रमास सौंदलगा काँग्रेस अध्यक्ष पुंडलिक भेंडुगळे, शिवगोंडा पाटील, दत्तात्रय पाटील, भगवान पाटील, सुदेश बागडी, बजरंग पाटील, राजू पाटील (अकोळ), ग्रा.पं.सदस्य अवधूत शिंदे, मल्लेश बोरगुंडे, सुरेश पाटील, शिवाजी सूर्यवंशी, आप्पा भानसे, आप्पा कारंडे, नितीन नेपिरे, बाबुराव पाटील उपस्थित होते. धनाजी भेंडुगळे यांनी सूत्रसंचालन केले.