Wed, Feb 20, 2019 19:01होमपेज › Belgaon › राज्यात विदेशी मद्याची चलती 

राज्यात विदेशी मद्याची चलती 

Published On: Apr 21 2018 12:59AM | Last Updated: Apr 20 2018 11:09PMबेळगाव : प्रतिनिधी

भारतीय बनावटीच्या मद्याचे दर एप्रिल 1 पासून वाढले असून विदेशी मद्याचे दर मात्र स्थिर विदेशातून आयात करण्यात येणार्‍या मद्याचे दर स्थिर असल्याने मद्यपींना हा सुगीचा हंगाम आहे. राज्य सरकारने अबकारी कर वाढविल्याने मद्याचे दर वाढले आहेत. हा कर 8 टक्क्यांनी वाढला आहे. यामुळे राज्यात 1 एप्रिल पासून मद्याचे दर वाढले आहे. विदेशी ब्रँडच्या दरांमध्ये मात्र वाढ झालेली नाही. राज्यात तुलना केल्यास शेजारील गोवा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि महाराष्ट्रामध्ये विदेशी ब्रँडच्या मद्याचे दर कमी आहेत. राज्यामध्ये करात बदल करण्यासाठी विदेशी मद्य पुरवठा दराने राज्य सरकारकडे प्रस्ताव ठेवला होता. यावर प्रदीर्घ चर्चा करण्यात आली असून यानंतर राज्य सरकारने स्लॅब निश्‍चित केला आहे, असे एसएलएन मद्य विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. राज्य सरकारने विदेशी मद्यावरील स्लॅबमध्ये बदल केला आहे. त्यानुसार 7651 रु. ते 15000 पयर्ंतच्या मद्याच्या ब्रँडवर 2000 ते 15000 रु. पेक्षा अधिक ब्रँडवर 3000 स्लॅब निश्‍चित केला आहे, असे अधिकार्‍यांकडून सांगण्यात येत आहे. 

विदेशी ब्रँडच्या दरामध्ये झालेल्या अचानक बदलामुळे अधिक दर देऊन संग्रहित करण्यात आलेली दारू कमी दरामध्ये विकण्याची वेळ आली आहे, असे मद्यविक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. 
दररोज एक ते दोन विदेशी ब्रँड मद्याच्या बाटल्यांची विक्री होते. सुधारित दर आल्याने यामध्ये मोठ्याप्रमाणात वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. तसेच आचारसंहिता जारी असल्याने ग्राहकांना केवळ दोनच बॉटल  खरेदी करण्याची सोय आहे. स्लॅबमध्ये बदल करून केवळ तीन महिने झाले आहे. त्यामुळे आयात करण्यात येणार्‍या मद्यातून  मिळणार्‍या उत्पन्नाची माहिती मिळणे अद्याप शक्य नसल्याचे अधिकार्‍यांकडून सांगण्यात येत आहे. 

Tags : Belgaum, Foreign, liquor,  state