Sun, May 26, 2019 19:33होमपेज › Belgaon › विदेशी चलन, नोटांचा संग्रह; विद्यार्थ्यांना  शैक्षणिक मदत

विदेशी चलन, नोटांचा संग्रह; विद्यार्थ्यांना  शैक्षणिक मदत

Published On: Jul 30 2018 1:28AM | Last Updated: Jul 30 2018 12:01AMबेळगाव : प्रतिनिधी

विविध देशांचे चलन संग्रहित करण्याबरोबर गरीब गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य देण्याचे काम करणारा सामाजिक कार्यकर्ता म्हणून  एम. एल. अग्रवाल यांची ओळख आहे.

खडेबाजार येथील हे रहिवासी गेल्या 50 वर्षापासून विविध देशांना व्यवसायानिमित्त भेटी देतात. विविध राष्ट्रांच्या चलनी नोटा, टपाल तिकिटे यांचा संग्रह करण्याचा छंद त्यानी जोपासला आहे. ठरावीक काळाने जगातील प्रत्येक राष्ट्र चलन बदलते. याची नोंद अगरवाल यांच्याकडे असून त्याप्रमाणे नोटांचा संग्रह जमविला आहे. पावसाळ्यात वॉटरफ्रुफ नोटा त्यांच्याजवळ आहेत. भारताबरोबर अमेरिका, नेपाळ, सिंगापूर, युरोप, रशिया, चीन, जपान, बांगलादेश, श्रीलंका या देशांचे चलन जमविले आहे.

व्यवसायानिमित्त भटकंती करताना सरकारी व खासगी शाळेतील गरीब व गरजू मुले शैक्षणिक साहित्य न मिळाल्याने ती शिक्षण घेण्यात मागे पडतात. याची दखल घेऊन गरीब मुलांना त्यांनी मदत केली आहे. ते सांगतात की, आपण कमविलेल्यापैकी 25 टक्के रक्कम समाजातील गोरगरिबांसाठी खर्च केली तर पुण्य मिळते. समाजसेवा हीच ईश्वरसेवा असे व्रत स्वीकारले आहे.