Tue, Apr 23, 2019 20:03होमपेज › Belgaon › भाजपच्या पराभवासाठी आंध्र प्रयत्नशील

भाजपच्या पराभवासाठी आंध्र प्रयत्नशील

Published On: Apr 26 2018 1:24AM | Last Updated: Apr 26 2018 12:41AMबंगळूर : प्रतिनिधी

आंध्र प्रदेशमधील एक गट बळ्ळारीमधील भाजप उमेदवारांच्या पराभवासाठी प्रयत्नशील आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यास विरोध केला आहे. ते कारण पुढे करून आंध्र प्रदेशमधील एक गट भाजपचा पराभव करण्यासाठी घरोघरी भेटी देवून विरोधी प्रचार करीत आहेत. या गटामध्ये 30 आंध्रप्रदेशमधील कार्यकर्त्यांचा समावेश असून ते भाजपला मतदान करू नका, असा जोरदार प्रचार करीत आहेत.

आंध्र प्रदेशचे विभाजन करण्यात आले. त्यावेळी भाजपाने आंध्र प्रदेशला 10 वर्षाच्या कालावधीपर्यंत विशेष दर्जा देण्याची घोषणा केली होती. परंतु नरेंद्र मोदी केंद्रात सत्तेवर येताच ते त्या आश्‍वासनाच्या विरोधी गेले. 

वास्तविक पाहता भाजपने तशी ग्वाही दिली होती, अशी माहिती पुलीवेंडला येथील विजय शंकर यांनी दिली आहे. नागरिकांच्या गाठीभेटी घेवून ते भाजपला मतदान करू नका असा प्रचार करीत आहेत. निवडणुकीपूर्वी जी आश्‍वासने भाजपने जनतेला दिलेली आहेत. परंतु त्या आश्‍वासनांची पूर्तता करण्यामध्ये नरेंद्र मोदी अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

नरेंद्र मोदींनी देशातील भ्रष्टाचाराचे निर्मूलन करण्याचा निर्धार केला आहे. परंतु आश्‍चर्य म्हणजे खाणसम्राट जनार्दन रेड्डी यांच्या समर्थकांना भाजपची उमेदवारी दिली आहे. सत्तेवर येताच 100 दिवसात सर्व काळा पैसा देशात आणण्याची घोषणा नरेंद्र मोदींनी केली होती. परंतु ते त्यांना अद्याप शक्य झाले नसल्याचे विजय शंकर यांनी म्हटले आहे. मद्य सम्राट विजय मल्या व निरव मोदी यांनी हजारो कोटींचे कर्ज घेवून देशाला डुबविले आहे. त्यांच्यामुळे देशाला झालेला तोटा कर भरून देशातील नागरिक त्या तोट्याचा भरणा करीत आहेत.

त्याचप्रमाणे रायलसीमासारख्या मागास भागामध्ये काडाप्पा स्टील प्रकल्प सुरू करून त्याला केंद्रामार्फत निधी उपलब्ध करून राबविण्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली होती. त्या बरोबरच विशाखापट्टण रेल्वे झोन, विशाखापट्टण - चेन्नई औद्योगिक कॉरीडॉर, दुर्गा राजपट्टण् बंदराचा विकास, पेट्रोलियम रिफायनरी व इतर विकास योजना राबविण्याची ग्वाही भाजपने दिली होती. 

परंतु त्या सर्व योजनांचा विसर भाजपला पडल्यामुळे त्या सर्व योजना शीतपेटीत पडल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. सध्या 30 कार्यकर्त्यांचा गट भाजपच्या विरोधार्थ प्रचार करीत असून निवडणुकीनंतर आपण नवी दिल्लीला न्यायासाठी धरणे सत्याग्रह सुरू करण्याचा इशाराही विजय शंकर यांनी दिला आहे.

 

Tags : belgaon, belgaon news, BJP defeat, Andhra efforts,