Mon, May 20, 2019 22:45होमपेज › Belgaon › कन्नड भाषिक उमेदवार निवडून आणण्यावर भर

कन्नड भाषिक उमेदवार निवडून आणण्यावर भर

Published On: Jul 13 2018 12:47AM | Last Updated: Jul 12 2018 11:04PMबेळगाव : प्रतिनिधी

महापालिका प्रभागांची नव्याने झालेली रचना, जाहीर झालेले आरक्षण यामुळे सध्या महापालिका निवडणूक विषय गाजत आहे. प्रभागनिहाय जाहीर झालेल्या आरक्षणासंबंधी नगरसेवक व नागरिकांनी  दि.8 ते बुधवार दि. 11 तारखेपर्यंत जिल्हाधिकार्‍यांकडे आक्षेप नोंदविले आहेत. प्रभागांचा बारकाईने अभ्यास करुन जास्तीतजास्त कन्नड भाषिक उमेदवार कसे निवडून येतील, यावर आधारित आरक्षण जाहीर झाले आहे, अशी चर्चा मनपा वर्तुळात रंगत आहे. 

नुकताच जाहीर झालेल्या प्रभागप्रमाणे आरक्षणानुसार 58 प्रभागांपैकी 27 प्रभागामध्ये महिलांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने सामान्य, इतर मागासवर्गीय अ व ब, अनुसूचित जाती-जमातीमधील महिलांना आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे यंदा महापालिकेत महिलाराज येणार असून जावयांची गर्दी महापालिकेत होणार अशी चर्चा आतापासूनच सुरु झाली आहे. आरक्षण जाहीर झाल्यापासून आपापल्या प्रभागात उमेदवाराचा शोध घेण्यात येत आहे. प्रभाग पुनर्रचना केल्यामुळे प्रभागाची मोडतोड करुन त्या प्रभागात कन्नड भाषिक उमेदवार कसा निवडून आणता येईल, यावर भर देण्यात आला आहे.  त्यामुळे प्रभागाची झालेली पुनर्रचना व जाहीर झालेल्या आरक्षणाला नागरिकांबरोबर आजी माजी नगरसेवकांनीदेखील आक्षेप घेतला आहे. 

प्रभागात बहुसंख्येने ज्या समाजाचे लोक राहतात. त्यांना डावलून आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे प्रभागाचा विकास होण्याऐवजी जातीच्या राजकरणावरच भर दिलेला दिसत आहे. सध्या कार्यरत असलेले नगरसेवक व माजी नगरसेवकांनी यावर आक्षेप घेतला असून शासन कोणता निर्णय घेणार, याकडे लक्ष लागून राहिलेले आहे.