Sun, May 26, 2019 18:41होमपेज › Belgaon › गोगटे सर्कलमध्ये फ्लायओव्हर

गोगटे सर्कलमध्ये फ्लायओव्हर

Published On: Jun 20 2018 1:13AM | Last Updated: Jun 20 2018 12:52AMबेळगाव : प्रतिनिधी

शहरात ओव्हरब्रीज बांधले तरी मुख्य चौकात वाहतूक कोंडी कायम राहणार असल्यामुळे गोगटे चौक ते ग्लोब थिएटरपर्यंत फ्लायओव्हर बांधण्याचा प्रस्ताव आखण्यात आला आहे. हा फ्लायओव्हर सध्या निर्मितीआधीन असलेल्या ओव्हरब्रीजला जोडला जाईल.

फ्लायओव्हर झाल्यास रेल्वे ओव्हरब्रीजवरून येणार्‍या वाहनांना गोगटे सर्कलमध्ये उतरण्याची गरज भासणार नाही. ते थेट ग्लोबकडे मुख्य रस्त्यावर उतरतील. तर काँग्रेस रोडवरून येणार्‍या वाहनांना रेल्वे स्टेशनकडे तसेच ग्लोबकडे येण्यासाठी मुख्य रस्ता मोकळा राहील. थोडक्यात गोगटे सर्कलमध्ये फक्त रेल्वे स्टेशन ते काँग्रेस रोड अशी पूर्व-पश्चिम वाहने धावतील. दक्षिण-उत्तर धावणारी वाहने फ्लायओव्हरवरून जातील, अशी ही व्यवस्था आहे.

मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या विकास आढावा बैठकीत फ्लायओव्हरचा प्रस्ताव मांडण्यात आला.रेल्वे उड्डाणपुलाचे काम ऑगस्टमध्ये पूर्ण झाले तरी गोगटे चौकात पुन्हा वाहतूक कोंडीची समस्या डोके वर काढणार आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते व कॅन्टोन्मेंटच्या अधिकार्‍यांनी सामजस्यांने तोडगा काढून गोगटे सर्कलमध्ये फ्लायओव्हरची निर्मिती करावी. बेळगावहून खानापूरला जाणार्‍या चारचाकी व दुचाकी गाड्या परस्पर फ्लायओव्हरवरून जातील. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होणार नाही, अशी सूचनाही खासदार सुरेश अंगडी यांनी दिली. 

सध्या पूर्ण होत आलेल्या रेल्वे उड्डाणपुलाच्या खालून वाहातुकीस रस्ता करण्यासबंधी कॅन्टोन्मेन्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दिव्या शिवराम यांचा सल्ला घेण्यात आला. त्या म्हणाल्या, हा भाग कॅन्टोन्मेन्टच्या हद्दीत असून पुलाखाली पाण्याचा स्रोत आहे. या भागात येणारी घरे व्यापारी संकुलेही पाडाावी लागतील. त्यासाठी केंद्र सरकाची परवानगी घ्यावी लागेल. गोगटे सर्कल ते ग्लोब थिएटर दरम्यान ओव्हर  फ्लायओव्हर संकल्पना राबविल्यास सहकार्य करु.

उड्डाणपूलासाठी 3 ऑगस्टची डेडलाईन

शहरातील रेल्वे उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्यात असून 3 ऑगस्टपूर्वी हा पुल वहातूकीस खुला होणार आहे. पुल झाल्यानंतर गोगटे सर्कलमध्ये वाहातुकीची कोंडी होणार असून त्यासाठी फ्लायओव्हरब्रिज करणे गरजेचे आहे. त्यासाठी तातडीने कामाला सुरुवात व्हावी, अशी सूचना खासदार सुरेश अंगडी यांनी दिली. 

बैठकीला निवासी जिल्हाधिकारी एस. बुध्दाप्पा, कॅन्टोन्मेंटच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दिव्या शिवराम, मनपा आयुक्त कृष्णगौडा तायण्णवर, शहर अभियंता लक्ष्मी निपाणीकर, हेस्कॉमचे सहायक कार्यकारी अभियंता अश्‍विन शिंदे, परशराम कोलकार, बीएसएनएल, सार्वजनिक बांधकाम खाते, पाणी पुरवठा अधिकारी उपस्थित होते.