होमपेज › Belgaon › नदीला पूर, बोट नादुरुस्त

नदीला पूर, बोट नादुरुस्त

Published On: Jul 21 2018 1:30AM | Last Updated: Jul 20 2018 7:50PMरायबाग : प्रतिनिधी

कृष्णा नदीला सन 2005-06 मध्ये महापूर आल्याने नागरिकांच्या रक्षणासाठी सरकारने नदी काठावरील नागरिकांसाठी दिलेली बोट आता बंद स्थितीत आहे.  गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदीस पूर आला आहे. असे असले तरी बोटीची व्यवस्था मात्र अद्याप करण्यात आलेली नाही.कृष्णा नदीस आलेल्या महापुरावेळी नागरिक व जनावरांचे रक्षण करण्यासाठी हेलिकॉप्टरद्वारा नागरिकांची सुटका केली होती. त्यावेळी बोटीने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. पण, सध्या ही बोट बंद स्थितीत आहे. या बोटीचे लाकूड कुजून गेले आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.

रायबाग तालुक्यातील बुवाची सौंदत्ती, डिग्गेवाडी, जलालपूर, भिर्डी गावात प्रत्येकवर्षी पूर आल्यास या गावात सर्व व्यवस्था केली जाते. यंत्रावर चालणारी बोटीची व्यवस्था केली जाते. परंतु यावर्षी तसे झाले नाही. तालुक्यातील बुवाची सौंदत्ती येथे बोटीची व्यवस्था केली नाही. या बोटीच्या दुरुस्तीबद्दल कोणत्याही अधिकार्‍यांनी इकडे लक्ष पुरविले नाही. यासाठी नागरिकांतून संताप व्यक्‍त करण्यात येत आहे. नदीच्या पाण्याची पातळी दिवसेंदिवस वाढत आहे. तहसीलदारांनी ग्रामपंचायतीस कर्मचार्‍यांना बोट दुरुस्तीबद्दल सांगितले आहे. पण, कार्यवाही झालेली नाही.