Fri, Apr 26, 2019 03:22होमपेज › Belgaon › अंत्यसंस्काराला जाताना कुटुंबातील पाचजण ठार

अंत्यसंस्काराला जाताना कुटुंबातील पाचजण ठार

Published On: Feb 19 2018 1:24AM | Last Updated: Feb 19 2018 1:51AMसंबरगी : प्रतिनिधी    

अंत्यसंस्काराला जाणार्‍या कुटुंबाच्या वाहनाला बसची धडक बसल्याने कुटुंबातील 5 जण जागीच ठार झाले. तर 10 जण जखमी आहेत. अथणी?कोटलगी रस्त्यावर आठहळ्ळी गावानजीक शनिवारी रात्री 11च्या सुमारास हा अपघात झाला. सर्व मृत ककमरी (ता. अथणी) येथील आहेत.अण्णाप्पा भीमप्पा जाधव (क्रूझर चालक, वय 40), अर्चना अण्णाप्पा जाधव (35), राधाबाई विठ्ठल जाधव (50), रवी श्रीकांत जाधव (13),  गौरव्वा मोहिते (65) अशी मृतांची नावे आहेत. मृत एकाच कुटुंबातील आहेत.

पुंडलिक रमेश जाधव (45), संगमेश फुटाणी (31), कस्तुरी सदाशिव जनगोंड (38) व अन्य 7 जणांना उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.अपघातग्रस्त बस अथणी आगाराची आहे. बसने क्रूझरला धडक दिल्याचे प्राथमिक तपासात दिसून येते.

ककमरी येथील जाधव कुटुंबीयांचे अवरखोड (ता. अथणी) येथील नातेवाईकाचे निधन झाल्याने क्रूझरने ते अवरखोडला निघाले होते. आठहळ्ळीजवळ बसने त्यांच्या वाहनाला धडक दिली. अपघातात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे. तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. वृत्त समजताच ऐगळी व अथणी पोलिसांनी अपघातस्थळाची पाहणी केली. जिल्हा पोलिस प्रमुख सुधीर रेड्डी यांनीही दुपारी अपघातस्थळी भेट देऊन पाहणी केली. अथणी पोलिस पुढील तपास करीत आहेत.