Sun, Mar 24, 2019 16:44होमपेज › Belgaon › बेळगावात दरोड्याच्या तयारीत असणार्‍या पाच जणांना अटक

बेळगावात दरोड्याच्या तयारीत असणार्‍या पाच जणांना अटक

Published On: Aug 12 2018 1:01AM | Last Updated: Aug 12 2018 1:01AMबेळगाव : प्रतिनिधी

रॉड, चाकू, कोयता, मिरचीपूड घेऊन दरोड्याच्या तयारीत असणार्‍या 5 जणांना खडेबाजार पोलिसांनी शुक्रवारी रात्री सरदार्स मैदानाजवळून अटक केली आहे. गुरुवारीही पोलिसांनी पीबी रोडवर पाच जणांना दरोड्याच्या तयारीत असताना अटक केली होती.

गणेश भीमा अनगोळकर (वय 30, रा. बुरुड गल्ली), राकेश रमेश क्षीरसागर (19, रा. रेल्वे क्वार्टर्स), राजेश मारुती सावंत (28, रा. कामत गल्ली),  सादिक अख्तर हुसेन तडकोड (28, रा. न्यू गांधीनगर), शिवराज जयवंत मोहिते (24, रा. केळकरबाग) अशी संशयितांची नावे आहेत. 

सरदार्स मैदानावर शुक्रवारी रात्री 12.30 च्या दरम्यान संशयास्पदरित्या फिरत असताना त्यांना अटक झाली.  त्यांच्याकडून कोयता, मिरचीपूड आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी खडेबाजार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिस निरीक्षक यू. एच. सातेनहळ्ळी या प्रकरणाची अधिक तपासणी करीत आहेत.