Thu, Jul 18, 2019 00:08होमपेज › Belgaon › भीषण अपघातात पाच ठार

भीषण अपघातात पाच ठार

Published On: Jun 03 2018 1:30AM | Last Updated: Jun 03 2018 1:24AMगुलबर्गा : वार्ताहर

ईशान्य कर्नाटक परिवहन महामंडळाच्या दोन बसेसची  धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात बसचालक, उर्दू शाळेच्या तीन शिक्षिकांसह पाचजण जागीच ठार झाले. तसेच वीस प्रवासी जखमी झाले आहेत. गुलबर्गा जिल्ह्यातील जेवरगीजवळ शनिवारी सकाळी 7  च्या सुमारास हा अपघात घडला. जखमींना जेवरगी येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गुलबर्गाकडून दावणगिरीकडे व सूरपूरहून गुलबर्गाकडे येणार्‍या बसेसची जेवरगीजवळ धडक झाली. रस्त्यावर आलेल्या कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात बसचालकाने सूरपूरकडून गुलबर्गाकडे निघालेल्या बसला धडक दिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. आयेशा सिद्धिकी, सहारा खातूम, फरीन बेगम या तीन शिक्षिकांसह बसचालक व अन्य एकजण या अपघातात ठार झाला. अपघातात ठार झालेल्या शिक्षिका गुलबर्गा येथील रहिवासी असून, त्या अनुक्रमे चिगरळ्ळी, चिगरट्टीहळ्ळी  व यळवार येथील प्राथमिक शाळेत काम करत होत्या. एका मृताची ओळख पटलेली नाही.