Wed, Apr 24, 2019 11:58होमपेज › Belgaon › वयाची ऐशीतैशी; ‘त्यांनी’ पार केली ऐंशी

वयाची ऐशीतैशी; ‘त्यांनी’ पार केली ऐंशी

Published On: Apr 30 2018 1:43AM | Last Updated: Apr 29 2018 8:44PMबेळगाव : प्रतिनिधी

राज्यात विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापत असून उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला आहे. राज्यात एकूण 3374 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी  277  अर्ज अवैध ठरविण्यात आले असून 3226 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये पाच उमेदवार वयाची 80 वर्षे पार केलेले आहेत. ‘हम भी कुछ कम नही’ असे म्हणत त्यांनीही विधानसभा आखाड्यात उडी घेतली आहे.  

सागर विधानसभा मतदारसंघातून पाचवेळा आमदार झालेले काँग्रेसचे कागोडू तिमप्पा 87 वर्षांचे असून ते निवडणूक रिंगणात उतरले आहेत. दावणगेरे दक्षिण मतदारसंघातून चारवेळा निवडून आलेले काँग्रसेचे 86 वर्षांचे शामनूर शिवशंकरप्पा मैदानात उतरले आहेत. त्याचबरोबर पाचवेळा आमदार झालेले यादगीर मतदारसंघातील मालक रेड्डी (वय 82) रिंगणात आहेत. हानगल मतदारसंघातून पाचवेळा विजयी झालेले  भाजपचे सी. एम. उदासी (वय 81) आणि सिंदगी मतदारसंघातून एकवेळा आमदारपदी विराजमान झालेले निजदचे उमेदवार 82 वर्षांचे एम. सी. मंगल्ली या निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहेत. 

या वृद्धांची टक्कर युवा उमेदवारांविरूद्ध होणार आहे.  मात्र चार ते पाचवेळा या उमेदवारांनी विजय संपादन केला असल्यामुळे त्यांच्याविरोधात उभे असलेल्या युवा उमेदवारांना यश मिळविणे तितके सोपे नाही. त्यामुळे काही मतदारसंघात कांटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.  आता मतदार या बुजुर्ग उमेदवारांना पुन्हा संधी देतात का, पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.  राज्यात 12 मे रोजी मतदान होणार असून निकालानंतर म्हणजे 15 मे रोजी चित्र स्पष्ट होणार आहे.