Mon, Apr 22, 2019 21:45होमपेज › Belgaon › ४० कि.मी. अंतरात पाच अपघात; दहाजण जखमी

४० कि.मी. अंतरात पाच अपघात; दहाजण जखमी

Published On: May 28 2018 1:46AM | Last Updated: May 27 2018 11:55PMनिपाणी : प्रतिनिधी

पुणे-बंगळूर महामार्गावर शनिवारी रात्री 10 ते पहाटे 6 या वेळेत  तवंदी घाट ते यमकनमर्डी हद्दीतील घटप्रभा पुलापर्यंत 40 कि. मी. अंतरात पाच अपघात झाले. चार अपघात कारचे तर एक दुचाकीचा झाला. दोघे गंभीर तर आठ जण किरकोळ जखमी झाले आहेत.

जखमींवर बेळगाव, निपाणी व गडहिंग्लज येथील खासगी व सरकारी रुणालयात उपचार सुरू आहेत. गोव्याहून इचलकरंजीकडे जात असलेली कार तवंदी घाट उतारावर आली असता चालकाचा ताबा सुटल्याने दुभाजकावर आदळली. यात चौघे जखमी झाले. एकाला गंभीर दुखापत झाली आहे. जखमींवर सरकारी म. गांधी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कोल्हापूरला हलविण्यात आले.

यमकनमर्डी पोलिस ठाणे हद्दीतील घटप्रभा नदी पुलाजवळ कोल्हापूरहून बेळगावकडे जाणारी कार दुभाजकावर आदळली. अपघातात दोघांना किरकोळ दुखापत झाली असून बेळगाव येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पहाटे 5 च्या सुमारास कणगला हिटणी सर्कलनजीक  गोव्याहून कोल्हापूरकडे जाणार्‍या कारने  वाहनाला धडक दिली. कारमधील पिता-पुत्र जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी गडहिंग्लज येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पहाटे 4 च्या सुमारास संकेश्‍वर बायपास रोडवर साखर कारखान्यासमोर दुचाकी घसरून हेब्बाळ येथील दोघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर संकेश्‍वर येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाचही अपघातांमुळे पोलिस प्रशासनाबरोबरच पुंज लॉईडच्या भरारी पथकाची धावपळ उडाली.

अपघातग्रस्त सर्वच वाहने रस्त्यावर पडल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. भरारी पथकाचे निरीक्षक सचिन हुक्केरी यांनी अपघातस्थळी सहकार्‍यांसह धाव घेऊन वाहने बाजूला करुन वाहतूक सुरळीत करून दिली.