Sun, Oct 20, 2019 12:17होमपेज › Belgaon › पाच काँग्रेस आमदार येडींबरोबर दिल्‍लीला?

पाच काँग्रेस आमदार येडींबरोबर दिल्‍लीला?

Published On: Aug 07 2018 12:58AM | Last Updated: Aug 07 2018 12:58AMबंगळूर : प्रतिनिधी

पालिका प्रशासन मंत्री रमेश जारकीहोळी, रहिम खान, नारायण राव यांच्यासह पाच आमदार भाजपच्या संपर्कात असून ते प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुराप्पा यांच्यासह दिल्‍लीला गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वृत्तवाहिन्यांनीही हे वृत्त प्रसारित केले असून, त्यामुळे कर्नाटकातील काँग्रेस-निजद आघाडी सरकार पाडण्याचे डावपेच भाजपकडून आखण्याचा प्रयत्न होत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

येडियुराप्पा सोमवारी दिल्‍लीला गेले. त्याच विमानात काँग्रेसचे पाच आमदार होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या निमंत्रणावरून ते दिल्‍लीला गेल्याचे समजते. स्वतंत्र उत्तर कर्नाटक राज्यासाठी 31 जुलै रोजी विविध मठाधीशांनी बेळगावातील सुवर्णसौधसमोर आंदोलन केले होते. त्यावेळी येडियुराप्पांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी त्यांनी ‘आगामी पंधरा दिवसांत काय होते ते पाहात राहा’ असे विधान केले होते. आणखी काही दिवसांत काय होणार, अशी चर्चा त्याचवेळी सुरू झाली होती. आता येडियुराप्पा आणि पाच काँग्रेस आमदार एकाच विमानातून गेल्याने तर्कवितर्क करण्यात येत आहेत.