Thu, Sep 20, 2018 18:12होमपेज › Belgaon › लग्‍नाची पहिली पत्रिका द्या तहसीलदार किंवा पोलिसांना!

लग्‍नाची पहिली पत्रिका द्या तहसीलदार किंवा पोलिसांना!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीमुऴे येत्या दोन महिन्यांत होणार्‍या विवाह समारंभावर सावट निर्माण झाले आहे. मात्र, जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांनी आचारसंहितेची धास्ती न घेण्याचे आवाहन केले आहे. कोणताही घरगुती समारंभ करण्यास अडथळा आणण्यात येणार नाही, असे अधिकार्‍यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

येत्या 12 मे ला विधानसभेची निवडणूक होणार आहे. तत्पूर्वी बर्‍याच जणांचे विवाह ठरलेले आहेत. काही ठिकाणी जत्रा तसेच अन्य सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आलेले आहेत. मात्र, आचारसंहिता लागू झाल्याने बर्‍याचशा उपक्रमांमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. त्यातच बर्‍याचशाह अफवांचे पीकही सुरू झाले आहे. लग्न समारंभ होणार नाहीत, सामाजिक कार्यक्रम होणार नाहीत, शैक्षणिक उपक्रम होणार नाहीत, अशा अफवा सोशल मीडियावरून सुरू झाल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता घाबरून गेली आहे. यासंदर्भात बेळगाव जिल्ह्याचे निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी एस. झियाउल्ला यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, कोणत्याही लग्नसमारंभाला आचारसंहितेचा फटका बसणारन नाही.  त्या त्या तालुक्यामधील जनतेने आणि विशेष करून ज्यांचे विवाह समारंभ आहेत, अथा जत्रा आहेत त्यांनी स्थानिक तहसीलदार किंवा पोलिस खात्याला केवळ अर्ज देण्याची आवश्यकता आहे. 

निवडणुकीच्या कालावधीत होणार्‍या या कार्यक्रमांना आचारसंहितेच्या नावाखाली आळा घालण्यात येणार नाही. मात्र, प्रशासनाची मंजुरी घेऊन त्या अटींनुसार आपले कार्यक्रम पार पाडण्याची गरज आहे, असे स्पष्ट करण्यात आले. 

घरगुती लग्नसमारंभ,  वाढदिवस व अन्य घरगुती धार्मिक कार्यक्रमांना आचारसंहिता लागू करण्यात आलेली नाही. मात्र, कोणताही प्रसंग उद्भवू नये यासाठी संबंधितांनी स्थानिक तहसीलदार किंवा पोलिस खात्याशी आपल्या कार्यक्रमांसंदर्भात अर्ज दावा त्यांना तत्काळ परवानगी देण्यात येईल.    - एस. झियाउल्ला, जिल्हा निवडणूक अधिकारी


  •