Thu, Apr 25, 2019 22:15होमपेज › Belgaon › गुन्हेगारांचा पोलिसांवर गोळीबार : दोघे जखमी

गुन्हेगारांचा पोलिसांवर गोळीबार : दोघे जखमी

Published On: Dec 16 2017 1:40AM | Last Updated: Dec 15 2017 11:04PM

बुकमार्क करा

गुलबर्गा : प्रतिनिधी

शहराच्या बाहेरील तावेरगेरा क्रॉसजवळ दोन कुख्यात गुन्हेगारांना अटक करण्याचा प्रयत्न केलेल्या पोलिसांवरच गोळीबार केल्यामुळे त्यामध्ये दोन पोलिस जखमी झाले आहे. ही घटना शुक्रवारी घडली आहे.

कुख्यात गुन्हेगार यशवंत सुल्तानपूर हा अनेक गुन्ह्यामध्ये पोलिसांना पाहिजे होता. अलिकडेच त्याच्यावर अपहरण व खून केल्याचा गुन्हा नोंदविलेला होता. त्याला पकडण्याचा प्रयत्न करणार्‍या दोन पोलिसावर त्याने गावठी पिस्तुलातून गोळीबार केला. त्यामध्ये दोन्ही पोलिस गंभीररित्या जखमी झाले आहेत. यशवंत याच्यावर केपीटीसीएलचे कंत्राटदार मानाप्पा यांचे अपहरण व खून केल्याप्रकरणी पोलिस त्याच्या मार्गावर होते. गेल्या दोन महिन्यापासून त्याने पोलिसांना चकवा देण्यात यश मिळविले आहे. या आरोपाबरोबरच तो या भागातील बेकायदा शस्त्रास्त्र विक्रेता म्हणूनही प्रसिद्ध आहे. 

शुक्रवारी सकाळी पोलिसांनी तावरगेरा क्रॉसजवळ बॅरिकेड्स लावून ते यशवंतची वाट पहात होते. त्यावेळी यशवंतने बॅरिकेड्स उडवून वासनासह पलायन केले. त्यावेळी पोलिसांनी त्याच्या वाहनाच्या टायरवर गोळीबार केला. त्यापैकी एक गोळी त्याच्या पायाला लागल्यामुळे तो जखमी झाला. पोलिसांनी त्याला अटक करून सरकारी इस्पितळा दाखल केले आहे. यशवंतच्या गोळीबारात जखमी झालेले पोलिस कुपेंद्र व कुशन यांनाही इस्पितळात दाखल केले आहे. घटनास्थळी जिल्हा पोलिस प्रमुख एन. शशिकुमार यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली आहे.