Wed, May 22, 2019 10:27होमपेज › Belgaon › भुयारी मार्गाची अखेर स्वच्छता

भुयारी मार्गाची अखेर स्वच्छता

Published On: Jul 14 2018 12:54AM | Last Updated: Jul 13 2018 8:31PMबेळगाव : प्रतिनिधी

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुमारे दीड कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या भुयारी मार्गाबाबत दै.‘पुढारी’ने वृत्त प्रसिद्ध करताच जिल्हा प्रशासनाने दखल घेऊन स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. भुयारी मार्गामध्ये साचलेला कचरा व घाण शुक्रवारी हटवण्यात आली.

जिल्हाधिकारी व न्यायालय आवारात ये-जा करताना मुख्य रस्त्यावर ताण येऊ नये, यासाठी मनपा आणि बुडाच्या पुढाकाराने सुमारे दीड कोटी रुपये खर्चून भुयारी मार्ग उभारण्यात आला. परंतु, या मार्गावर वकिलांनी बहिष्कार घातला आहे. यामुळे या मार्गाचा वापर कोणीच करत नाही. परिणामी जिल्हाधिकारी कार्यालयात वेगवेगळ्या कारणांनी येणार्‍यांकडून भुयारी मार्गाचा वापर मलमूत्र करण्यासाठी होत होता. त्यामुळे या भागात दुर्गंधी पसरली आहे.याबाबतचे सविस्तर वृत्त दै. ‘पुढारी’तून गुरुवार 12 रोजी ‘भुयारी बनला दुर्गंधी मार्ग’ या मथळ्याखाली प्रसिद्ध करण्यात आले. त्यानंतर प्रशासनाने शुक्रवारी स्वच्छता मोहीम राबविण्याचे आदेश दिले. त्यानुसार स्वच्छता करण्यात आली. यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.