Thu, Jul 18, 2019 04:59होमपेज › Belgaon › येळ्ळूर येथे सीमा सत्याग्रहींचा सत्कार

येळ्ळूर येथे सीमा सत्याग्रहींचा सत्कार

Published On: Jan 28 2018 3:36PM | Last Updated: Jan 28 2018 3:36PMबेळगाव: प्रतिनिधी

येळ्ळूर विभाग म. ए. समितीतर्फे साराबंदी व सीमा सत्याग्रहींचा सत्कार समारंभ कार्यक्रम आज संपन्न झाला. हा कार्यक्रम येळ्ळूर येथील सैनिक भवनात घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी. ता. प. सदस्य रावजी पाटील होते.
 व्यासपीठावर मध्यवर्ती  म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किणेकर, दिनेश ओऊळकर, कृष्णा मेनसे, ऍड. राम आपटे, किसनराव येळ्ळूरकर, माजी आमदार परशुराम नंदीहल्ली, माजी महापौर मालोजी अष्टेकर, येळ्ळूर ग्रा. पंचायत आद्यक्षा अनुसया परीट आदी उपस्थित होते. यावेळी ६५ सीमासत्याग्रहींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या दरम्यान बेळगाव, बिदर, भलकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या अशा घोषणा देण्यात आल्या.