Sun, May 19, 2019 14:53
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › राज्यातील शेतकर्‍यांना वृक्षारोपण सक्‍ती

राज्यातील शेतकर्‍यांना वृक्षारोपण सक्‍ती

Published On: Sep 07 2018 1:04AM | Last Updated: Sep 06 2018 10:38PMबंगळूर : प्रतिनिधी

शेतकर्‍यांनी आपल्या जमिनीत प्रति एकर किमान 20 झाडे लावणे सक्‍तीचे करण्याचा कायदा अस्तित्वात आणण्याचा विचार केला जात  आहे. वनविकासमंत्री आर. शंकर यांनी ही माहिती दिली.

प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाच्या वेबसाईटचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. चंदनासारख्या मौल्यवान झाडासह विविध प्रकारची रोपे लावता येतील. प्रत्येक झाडामागे 100 रुपये प्रोत्साहन धन देण्यात येईल. एका एकरात जास्तीत जास्त 400 झाडे  वाढवता येतात. यामुळे पर्यावरणाचे संरक्षण करता येईल.  पण किमान 20 झाडे तरी लावण्याची सक्ती होईल. तज्ज्ञांशी याबाबत चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आर. शंकर यांनी दिली. राखीव आणि संरक्षित जंगलांमध्ये रिसॉर्ट प्रारंभ करण्याची परवानगी दिलेली नाही. विनापरवाना रिसॉर्ट सुरू केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. राज्यात 21 टक्के जंगल होते. त्यामध्ये दीड टक्के वाढ झाली आहे.