Thu, Jul 18, 2019 10:15होमपेज › Belgaon › अस्वलाच्या हल्यात शेतकरी गंभीर

अस्वलाच्या हल्यात शेतकरी गंभीर

Published On: Jun 06 2018 5:12PM | Last Updated: Jun 06 2018 5:12PM खानापूर प्रतिनिधी: पुढारी ऑनलाईन

 खानापूर शहरापासून अवघ्या पाच किमी अंतरावर असलेल्या कौंदल गावच्या शिवारात कोळपणीचे काम करत असताना एका शेतकऱ्यावर अस्वलाने हल्ला केला. हल्यात शेतकरी झाला असुन त्याचे  गणेश अणू पाटील असे आहे.

मंगळवारी सायंकाळी कौंदल जवळील शिवारात नागरिकांना अस्वलाचे दर्शन झाले होते. रात्रीच याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली होती. आज सकाळी अस्वलाला जंगलात पिटाळून लावण्यासाठी वन विभागाच्या पथकाने मोहीम सुरू केली होती. त्यामुळे डोंगरावरून हे अस्वल खाली आले. 

याचदरम्यान अस्वलाची गणेश यांच्याशी गाठ पडली. समोर आलेल्या शेतकऱ्यावर तुटून पडून डोक्याच्या पाठीमागे व चेहर्‍यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले आहे. त्याला बेळगाव येथील केएलई रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.