Sat, Jul 20, 2019 10:40होमपेज › Belgaon › ‘कुटुंबातील सर्वांचेच लाखापर्यंतचे कर्ज माफ’

‘कुटुंबातील सर्वांचेच लाखापर्यंतचे कर्ज माफ’

Published On: Aug 21 2018 1:31AM | Last Updated: Aug 20 2018 11:23PMबंगळूर : प्रतिनिधी

शेतकरी कर्जमाफी आदेशात एका कुटुंबासाठी 1 लाख रुपयांचे कर्ज माफ, असा उल्‍लेख आहे. तो मागे घेऊन कुटुंबातील सर्वांचे कर्ज माफ, असा उल्‍लेख करण्यात येणार असल्याचे आश्‍वासन सहकार मंत्री बंडेप्पा काशमपूर यांनी दिले.

सोमवारी माजी मुख्यमंत्री दिवंगत देवराज अर्स यांच्या 103 व्या जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. संपूर्ण कुटुंबाचे लाखाचे कर्ज असा उल्‍लेख मागे घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. कुटुंबात कितीही सदस्य असले तरी त्यांनी घेतलेल्या कर्जापैकी लाखाचे कर्ज माफ होणार आहे. याआधी कुटुंबातील एकाच सदस्याचे कर्ज माफ केले जाणार होते. नव्या निर्णयामुळे राज्यातील तमाम शेतकर्‍यांना कृषिकर्जमाफीचा लाभ होणार आहे.