Sun, Nov 18, 2018 12:20होमपेज › Belgaon › खेळता खेळता विहिरीत पडून बालकाचा मृत्यू

खेळता खेळता विहिरीत पडून बालकाचा मृत्यू

Published On: May 04 2018 1:53AM | Last Updated: May 04 2018 1:18AMनिपाणी : प्रतिनिधी

खेळता खेळता विहिरीत पडल्याने पाच वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी निपाणी-चिकोडी रस्त्याशेजीरील शेतवडीत घडली. अमृत  महेश कांबळे असे बालकाचे नाव आहे.

अमृत बालवाडीत शिकत होता. गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास मित्रासमवेत बागेवाडी बंधू विहिरीलगत खेळण्यासाठी गेला होता.सोबत त्याचा भाऊही होता. खेळता खेळता अमृत तोल जाऊन जाऊन विहिरीत पडला. त्याच्या भावासह इतर मुलांनी घरच्यांना माहिती दिल्यानंतर आई-वडिलांसह शेजार्‍यांनी धाव घेतली.

बसवेश्‍वर चौक पोलिसांमार्फत अग्निशामक विभागाला पाचारण करण्यात आले.  अग्निशामक विभागाचे निरीक्षक ए. के. नदाफ यांनी अमृतला बाहेर काढले, पण तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. आपल्या आजोळी करोशी येथे गेलेला अमृत गुरुवारीच घरी परतला होता.