Mon, Apr 22, 2019 03:41होमपेज › Belgaon › बनावट नोटा छापा प्रकरण : सूत्रधार बंगालचा, छपाई पाकिस्तानात?

बनावट नोटा छापा प्रकरण : सूत्रधार बंगालचा, छपाई पाकिस्तानात?

Published On: Mar 17 2018 1:15AM | Last Updated: Mar 16 2018 9:03PMबेळगाव : प्रतिनिधी

बनावट नोटा  शेजारच्या पाकिस्तानात छापल्या जात असून तेथे लष्करासह सरकारी यंत्रणा भारतीय नोटा बनविण्याच्या धंद्यात सक्रिय आहेत. यामुळेच खर्‍याखुर्‍या नोटांसारख्या नोटा तयार करणे शक्य होते, असे एनआयएकडून सिध्द झाले असल्याचे एनआयएच्या  अधिकार्‍यांनी सांगितले. दरम्यान, बनावट नोटांमागे बडा नेता असल्याचा संशय राष्ट्रीय तपासणी पथकाला (एनआयए) असून, त्यामुळे बंगळूरमध्येही खळबळ माजली आहे.

नकली नोटांचे  मुख्य केंद्र भारत  व बागंलादेशाच्या सीमेवरील पश्‍चिम बंगालमधील मालदा हा जिल्हा आहे. 1971 साली भारत व पाकिस्तानात झालेल्या युध्दानंतर बांगलादेशाची निर्मिती झाली. यावेळी बांगलादेशातून आलेले निर्वासित मालदा जिल्ह्यात राहिले. आजदेखील बांगला देशातून रोज लोंढे येणे सुरुच  आहे. या भागाची रचना अशी आहे की या भागातून दोन्ही देशांमध्ये सुरक्षा यंत्रणांना चकवा देवून सहज येता येते, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

बनावट नोटांचा व्यवसाय येथील अनेक लोक करीत असून सदर नोटा पाकिस्तानातून बांगलादेशमार्गे येतात. मालदा येथील बनावट नोटांच्या सुळसुळाटाची कल्पना 2016 साली मोदी सरकारने नोटबंदी आणल्यानंतर बिथरलेल्या काळ्या धंद्यावाल्यानीं चक्क पोत्यांनी गंगा नदीत नकली नोटा फेकून दिल्या, तेव्हा आली.

देशाची अर्थिक स्थिती खिळखिळी  करणे हा बनावट नोटा सूत्रधाऱांचा मुख्य हेतू आहे. अंमली पदार्थ तस्करीसाठी  खोट्या नोटांचा वापर केला जातो. मुख्य केंद्रापासून  नोटा चलनात आणण्यासाठी मोठे जाळे असते. यात काम करणार्‍या प्रत्येक व्यक्तीला कमिशन असते. यात नोटा एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणाला पोचविणार्‍या व्यक्तींना कुरीयर म्हटले जाते. अशाच प्रकारचे कुरीयरचे काम पुण्यात अटक करण्यात आलेला ढालूमिया इस्लमा करीत होता.

दक्षिण भारतात विस्तार 

गेल्या दशकात हा व्यवसाय दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. दक्षिण भारतात विशेषत: चेन्नईसारख्या मोठ्या शहरांमध्ये हा व्यवसाय मोठ्या प्रमामणात आहे, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. 

सीमावर्ती भागाची  निवड : बनावट नोटा तस्करी व चलनासाठी विविध राज्यांच्या सीमावर्ती भागातील छोट्या शहरांची निवड केली जाते. याचे कारण म्हणजे या भागात असलेली अशिक्षितपणा, सुरक्षा यंत्रणांना चकवा देवून दुसर्‍या राज्यात सहजपणे पळून जाण्याची सुलभता.

बनावट नोटा खपवण्यासाठी मजूरासह रोजंदारीवर काम करणार्‍यांना कमी वेळेत जास्त पैशाची लालसा असल्यांना ओढले जातेे. त्यामुळे  विशेषत: बंगाली, बिहारी मजूरांचा समावेश असतो.

कुरियरबॉय बदलला जातो. : एका शहरातून दुसर्‍या शहरापर्यंत नकली नोटांची तस्करी करण्यासाठी प्रत्येक वेळी व्यक्ती बदलला जातो. त्याला कुरीयर बॉय महटले जाते. यामुळे सुरक्षा यंत्रणांना चकवा देणे सोपे होते.

देशद्रोहाचा गुन्हा : बनावट नोटा चलनात आणणे व तस्करी हा भारतीय कायद्यानुसार मोठा गुन्हा आहे. भारतीय दंड संहिता कलम 489 बी व सी गुन्हा दाखल केल्याने  दहा वर्षे ते 25 वर्षापर्यंत कारावास होऊ शकतो.

पोलिसांचे सहकार्य ः काटे

एनआयएचे मिलींद काटे म्हणाले पुढील काळात देखील कर्नाटकात कारवाई सुरु असणार आहे. मागील तीन दिवसांत बेळगांव एसपी सुधीरकुमार रेड्डीं व इतर पोलिसांचे चांगले सहकार्य लाभले.

चिकोडीतील नोटेतील फरक 

चिकोडीत सापडलेल्या नोटा खर्‍या नोटांसारख्याच आहेत. रंग व इतर रचना सारखीच आहे. फक्त नोटच्या मधोमध उभा जो धागा असतो, तो बनावट नोटेत नाही. त्याद्वारे जाणकार माणसाच्या लक्षात येऊ शकते. पण सामान्य माणूस मात्र फसतो.

निपाणीत केली राहण्याची सोय

चिकोडीत सापडलेल्या बनावट नोटांमागचा सूत्रधार बंगालचा असला तरी त्याची राहण्याची सोय निपाणीत करण्यात आली होती. निपाणीतच बनावट नोटा खपवण्यासाठी बैठका व्हायच्या, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

चिकोडीत सोमवारी मुंबईच्या एनआयए  पथकाने छापा टाकून नकली नोटा ताब्यात घेतल्यानंतर चिकोडीसह, रायबाग, कुडची, मुधोळमध्ये चौकशी करण्यात आली. सदर प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय कनेक्शनचा तपास स्वत: एनआयए मुंबई ब्रँचचे  एसपी  विक्रम खलाटे यांच्या मार्गदर्शनाखाली  कर्नाटकात सुरु आहे. या प्रकरणातील मुख्यसूत्रधार ढालूमिया इस्लाम व चिक्कोडीतून अटक करण्यात आलेला अशोक  कुंभार आणि रायबाग तालुक्यात अटक करण्यात आलेला राजेंद्र पाटील चिकोडी पोलिसांच्या ताब्यात आहेत. 

अशोककडून निपाणीत ढालूमियाची सोय : 

बनावट नोटा प्रकरणातील मुख्य सूत्रधार पश्‍चिम बंगालचा ढालूमिया इस्लाम याचा संबंध चिकोडीच्या अशोक कुंभारशी अनेक वर्षांपासून असल्याचे स्पष्ट झाले आहे. ढालूमिया विदेशातून इतरांच्या सहकार्याने नकली नोटा निपाणी आणायचा. प्रत्येकवेळी ढालूमियाची राहण्याची व जेवणाची सर्व सोय अशोक  कुंभार करत होता. 

रडारवर एक वर्षांपासून 

अशोक कुंभार  यापूर्वी पतसंस्थेत काम करत होता.  त्वरित श्रीमंत होण्याच्या आशेपोटी तो या नकली नोटा तस्करीत उतरल्याचे स्पष्ट झाले आहे. अशोक अनेक वर्षांपासून या धंद्यात शामिल मागील एक वर्षापासून अशोकच्या मागावर होतरायबाग रायबाग तालुक्यातल गुंडवाड येथून ताब्यात घेण्यात आलेला राजेंद्र पाटील व अशोक कुंभार यांच्यातील आर्थिक देवाणघेवाणीतून अशोकने नकली नोटा दिला होता. पण राजेंद्रने सदर नोटा जाळल्याचे पथकाकडून कळाले आहे.     

Tags : Belgaon, Belgaon news, Fake Currency Raid Case, compere Bangal, printed Pakistan,