कारखान्यांचे धुराडे २० दिवसांत पेटणार 

Last Updated: Oct 11 2019 12:35AM
Responsive image

Responsive image

बेळगाव : प्रतिनिधी

उसाची कमतरता आणि दुसर्‍या कारखान्यांशी स्पर्धा यामुळे यंदा गळीत हंगाम येत्या 20 ते 22 दिवसांत सुरु होण्याची शक्यता आहे. यासाठी  जिल्ह्यातील 25 साखर कारखान्यांनी जय्यत तयारी केली असून यासाठी केंद्र शासनाच्या आदेशाच्या प्रतीक्षेत कारखानदार आहेत.

यावर्षी बेळगाव जिल्ह्यात 2 लाख 50 हजार हेक्टर हे ऊस लागवडीचे क्षेत्र असून यातील 1 लाख 10 हजार हेक्टरमधील उसाचे पुरामुळे नुकसान झाले आहे. यामुळे यंदा उसाचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. जवळपास 50 टक्के क्षेत्रातील ऊस पिकाचे नुकसान झाले आहे. बेळगाव जिल्ह्यातूनच महाराष्ट्रातील अनेक कारखान्यांना ऊस पुरवठा होतो. बेळगाव जिल्ह्यामध्ये यावर्षी जवळपास 25 कारखान्यांचा हंगाम सुरु होणार आहे. यासाठी सर्वच कारखान्यांनी तयारी सुरु केली आहे. 

उसाची कमरता असल्यामुळे यंदाचा हंगाम दोन ते अडीच महिने चालण्याची शक्यता आहे. यावर्षी बेळगाव जिल्ह्यामध्ये मार्कंडेय सहकारी साखर कारखाना काकतीच्या रुपाने कारखान्यांची संख्या 25 वर पोहचली आहे. 

एकीकडे ऊसाचे उत्पादन 50 टक्के घटल्याने आणि दुसर्‍या बाजूला कारखान्यांची संख्या वाढल्याने यंदा ऊसाची पळवापळव होण्याची शक्यता आहे. यासाठी यावर्षी कारखाना लवकर सुरु करण्यासाठी सर्व कारखानदारांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. ऊस तोड आणि वाहतूकदारांशी करार करण्यात आले आहेत. ऊस उत्पादक शेतकर्‍यांबरोबरही संवाद साधण्यात येत आहे. 

सन 2018-19 मध्ये बेळगाव जिल्ह्यात तीन ते साडेतीन महिने कारखान्यांचा हंगाम चालला होता.गतवर्षी 1 कोटी 55 लाख 47 हजार 155 टन ऊसाचे गाळप होऊन 1 कोटी 74 लाख 33 हजार 279 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते. यावर्षी दोन ते अडीच महिने कारखान्यांचा हंगाम चालण्याची शक्यता आहे. यामुळे जवळपास गतवर्षाच्या तुलनेत 60 टक्के गाळप आणि उत्पादन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

यावर्षी जास्तीत जास्त ऊस आपल्याकडे आणण्यासाठी कारखानदारांचा प्रयत्न आहे. केंद्राच्या साखर संचालकांच्या अहवालानंतर हे कारखाने सुरु होणार आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सर्व कारखाने सुरु होण्याची शक्यता आहे. काही काराखानदारांनी ऑक्टोबरमध्ये कारखाने सुरु करण्यासाठी जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. यामुळे आगामी वीस ते बावीस दिवसात सर्व कारखान्यांची धुराडे पेटण्याची शक्यता आहे.

देशात पहिल्यांदाच उच्चांकी कोरोनाबाधितांची नोंद! भारत जगात ९ व्या स्थानी 


कोरोना योद्ध्यावर शाबासकीची थाप; सापडलेले अडीच तोळ्याचे मंगळसूत्र केले परत


कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचं टेन्शन कायम! दिवसभरात ४७ रुग्ण पॉझिटिव्ह 


कोल्हापूर : आमजाई व्हरवडे येथे रुग्ण सापडल्याने भितीचे वातावरण 


खासदार नवनीत राणांकडून पतीचे केशकर्तन (video)


महाराष्ट्रातील बाराशे नागरिक युएईत अडकले; मुंबईत येण्यासाठी मागितली परवानगी


यंदा आषाढी वारी पायी नाही; पण, माऊलींच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार


अन् माकडांनी हिसकावले कोरोना रूग्‍णांचे सॅम्‍पल


कोल्हापूर : साईबाबा स्वतः भक्तांशी बोलतात; असा बहाणा करून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश


छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन