Wed, Nov 21, 2018 15:24होमपेज › Belgaon › राज्यातील शिक्षकांच्या बदली प्रक्रियेला मिळाली मुदतवाढ 

राज्यातील शिक्षकांच्या बदली प्रक्रियेला मिळाली मुदतवाढ 

Published On: Jan 10 2018 1:56AM | Last Updated: Jan 10 2018 12:21AM

बुकमार्क करा
बेळगाव :  प्रतिनिधी 

राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या या महिन्यात होऊ घातलेल्या बदली प्रक्रियेला प्राथमिक शिक्षकांनी विरोध दर्शविल्याने राज्य सरकारने बदली प्रक्रियेसाठी नव्याने अर्ज करण्याकरिता 20 तारखेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे  शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. लवकरच दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणार आहेत. त्यातच विधानसभेच्या निवडणुकाही घेण्याकरिता हालचाली सुरू आहेत. या पार्श्‍वभूमीवर परीक्षाही मार्च व एप्रिल महिन्यात घेण्यात येणार आहेत. याबाबत शिक्षकांतून नाराजी व्यक्‍त करण्यात आल्याने राज्य सरकारने नवी अधिसूचना जारी करून येत्या 20 तारखेपर्यंत अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.  

शैक्षणिक वर्ष संपताना बदल्या केल्यास अडचणी निर्माण होणार  असल्यामुळे शिक्षक संघटनांनी विरोधी दर्शविला होता. त्याची दखल घेऊन राज्याच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाने 
बदली प्रक्रियेला मुदतवाढ  दिली.