Mon, Mar 18, 2019 19:28होमपेज › Belgaon › मुंबईत 26 रोजी तज्ज्ञ समिती बैठक

मुंबईत 26 रोजी तज्ज्ञ समिती बैठक

Published On: Jul 11 2018 1:35AM | Last Updated: Jul 10 2018 11:49PMबेळगाव : प्रतिनिधी

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍नी महाराष्ट्राच्या तज्ज्ञ समितीची बैठक गुरुवार 26 रोजी मुंबईत होणार आहे.  प्रा. एन. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. सीमाप्रश्‍नाचा खटला सर्वोच्च न्यायालयात आहे. खटला रोस्टर पद्धतीने सुनावणीसाठी येणार आहे. तत्पूर्वी, महाराष्ट्राकडून खटल्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात येणार आहे. बेळगावमधून मध्यवर्ती म. ए. समितीचे सदस्य बैठकीसाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सीमाप्रश्‍नाचा खटला महत्त्वपूर्ण टप्प्यावर आहे. उन्हाळी सुट्टीनंतर सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज सुरू झाले आहे. यामुळे खटला कधीही सुनावणीसाठी येण्याची शक्यता आहे. त्यादष्टीने महाराष्ट्राकडून तयारी करण्यात येत आहे.

न्यायालयाने एकदा फेटाळलेली कर्नाटकची याचिका फेरविचारासाठी येणार आहे. अंतरिम अर्जावरही सुनावणी होण्याची शक्यता आहे.कर्नाटकाने सीमाप्रश्‍नावर सुनावणी करण्याचा अधिकार न्यायालयाला नाही, असा दावा केला आहे. आर. एम. लोढा सरन्यायाधीश असताना त्यांनी ही मागणी फेटाळली होती.