Thu, Jun 27, 2019 16:35होमपेज › Belgaon › बांगलादेशी घुसखोरांना हद्दपार करा

बांगलादेशी घुसखोरांना हद्दपार करा

Published On: Aug 07 2018 12:58AM | Last Updated: Aug 06 2018 10:54PMबेळगाव : प्रतिनिधी

आसाममध्ये 40 लाखाहून अधिक बांगलादेशी घुसखोर असल्याचे आढळून आले आहे. त्यांना देशाबाहेर हद्दपार करण्याची मागणी श्रीरामसेनेतर्फे करण्यात आली. सोमवारी उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निर्दशने करून देण्यात आले.श्रीरामसेना जिल्हाप्रमुख विक्रम बणगे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. यावेळी श्रीरामसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आसाम येथे नागरिकत्व सिद्ध करण्याचे अभियान सुरू आहे. यामध्ये 40 लाखाहून अधिक बांगलादेशी आसाममध्ये बेकायदेशीरपणे राहत असल्याचे आढळून आले आहे. ही घटना देशाच्यादृष्टीने अतिशय घातक असून भारताच्या सुरक्षेचा प्रश्‍न यामुळे निर्माण होऊ शकतो. त्याचबरोबर सामाजिक, आर्थिक, राजकीय, व्यापार, उद्योग क्षेत्राला सदर बाब धोकादायक आहे. यामुळे बेकायदेशीरपणे निवास करणार्‍या बांगलादेशींना देशाबाहेर घालण्याची आवश्यकता असल्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. विनय अंग्रोळी, उमेश हळदणकर, राहुल दिवटगी,किरण शेट्टी, नितीन चौगुले, पवन रेडेकर, श्रावण शिवलकर, राजीव कांबळे, नितीन गडकर आदीसह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.