Mon, Apr 22, 2019 06:14होमपेज › Belgaon › कर्नाटकात डांबले तरी, आम्ही महाराष्ट्राचेच 

कर्नाटकात डांबले तरी, आम्ही महाराष्ट्राचेच 

Published On: Jan 08 2018 1:12AM | Last Updated: Jan 07 2018 11:54PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

कर्नाटक सरकार मराठी भाषकांना खूप त्रास देते. मराठी माणसाची गळचेपी कशी करता येईल, हे सतत पाहिले जाते. मराठी माणूस शांत आहे. म्हणून कर्नाटक सरकारचे फावते. सीमाप्रश्‍न सर्वोच्च न्यायालयात आहे. आम्ही लोकशाही मार्गाने लढा देत आहोत. आम्हाला कर्नाटकात डांबले तरी आम्ही महाराष्ट्राचेच आहोत, असे रोखठोख प्रतिपादन जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांनी केले. 

श्री बलभीम साहित्य संघ, कुद्रेमानी ग्रामस्थ आयोजित मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करून त्या बोलत होत्या. व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. मिलिंद जोशी, डॉ. सरिता गुरव उपस्थित होत्या. सरस्वती पाटील म्हणाल्या, गाव लहान असले तरी चालेल पण महान असले पाहिजे. ज्ञानाची पेटी कुद्रेमानीच्या रयतात भरली आहे. महाराष्ट्राच्या भूमीत वाढलेले हे गाव कर्नाटकात अन्यायाने डांबले गेले आहे. ते महाराष्ट्रात येईपर्यंत आम्ही लढत राहू. 

प्रवेशद्वार उद्घाटन मारुती पाटील यांनी केले. पॉलिहैड्रॉन व्यासपीठाचे उद्घाटन गौरव चौगुले, परशराम मीनाजी गुरव स्मारकपूजन विठ्ठल रखुमाई मंदिर कमिटी अध्यक्ष परशराम पाटील, ग्रंथदालनाचे उद्घाटन शिवसंत संजय मोरे, हभप मष्णू मल्लू पाटील सभामंडप उद्घाटन डॉ. एन.एम. गुरव, संत ज्ञानेश्‍वर प्रतिमापूजन मीनाजी गुरव, सरस्वती प्रतिमापूजन अ‍ॅड. सुधीर चव्हाण, सावित्रीबाई फुले प्रतिमापूजन जोतिबा गुरव, महात्मा जोतिबा फुले प्रतिमापूजन शटप्पा काकतकर, शिवप्रतिमा पूजन बाळाराम पाटील, डॉ. आंबेडकर प्रतिमापूजन अ‍ॅड. शाम पाटील, राजर्षी शाहू महाराज प्रतिमापूजन नितीन पाटील व संत तुकाराम प्रतिमा पूजन रघुनाथ गुडेकर यांनी केले. 

सरस्वती पाटील, संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. जोशी, माजी आ. मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, दत्ता उघाडे, निळूभाऊ नार्वेकर, आर.आय. पाटील, गोविंद पाटील, राजू किणयेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. स्वागताध्यक्ष हेमंत पाटील म्हणाले, सीमाभागातील भाषा, संस्कृती जिवंत ठेवण्याचे कार्य संमेलनाच्या माध्यमातून केले जाते. कर्नाटक सरकारच्या गुलामगिरीतून सीमाभाग लवकर सुटेल.

बलभीम साहित्य संघाचे अध्यक्ष मोहन शिंदे यांनी प्रास्ताविक केले. इतिहासाचे रंग रूप हे आले या गावा, हे स्वागतगीत विद्यार्थिनींनी गायिले. व्यासपीठावर ग्रा. पं.अध्यक्षा अशिता सुतार, काशिनाथ गुरव, श्यामला गुरव, लक्ष्मणराव होनगेकर, अर्जुन जांबोटकर, जोतिबा बडसकर, ज्ञानेश्‍वर पाटील, मोहन धामणेकर, अमृत जत्ती, परशराम पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन शिवाजी शिंदे, जी. जी. पाटील यांनी केले. 

विशेष सत्कार 

डॉ. सरिता गुरव, संकेत पाटील, शिवसंत संजय मोरे, मल्लाप्पा गुरव, निखिल देसाई, वीरपत्नी रूपा देवण, निवृत्त सैनिक संजय देवण, श्यामजी पाटील, शांताराम गुरव, जोतिबा गुरव, नामदेव गुरव, लक्ष्मण धामणेकर, अरविंद पाटील, मारुती काकतकर, दीपक काकतकर, विश्‍वास धामणेकर, संभाजी पाटील, यशवंत पाटील आदींचा सत्कार प्रा. डॉ. जोशी व सरस्वती पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.