Fri, Apr 26, 2019 01:42होमपेज › Belgaon › ‘एंटरप्राईजेस निधी’ची सीओडी चौकशी व्हावी

‘एंटरप्राईजेस निधी’ची सीओडी चौकशी व्हावी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

2014 सालापासून आतापर्यंत एंटरप्राईजेस निधीत साडेचार कोटी रुपये गोळा झाले आहेत. या निधीतून तातडीची कामे हाती घेणे आवश्यक असताना त्यावर अधिकार्‍यांकडून संशयास्पद उत्तरे देण्यात येत आहेत. त्यामुळे हा एंटरप्राईजेस निधी विनियोगाची ‘सीओडी’ (गुप्तचर विभाग) चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक डॉ. दिनेश नाशीपुडी यांनी केली. दरम्यान, सत्ताधारी सदस्यांनी निधी चौकशी मागणीला पाठिंबा दर्शविण्याऐवजी आयुक्‍तांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी आयुक्‍त कुरेर म्हणाले, 3 वर्षांत 20 कोटी रुपये कामांचा प्लॅन बनविण्यात आला. मनपा अनुदानातून कामे हाती घेताना कर्मचार्‍यांच्या वेतनाचा ताण पडत आहे. एसएफसी अनुदानातील 9 कोटी रुपये, घरपट्टीला अन्य निधीतून कामे हाती घेण्यात येत आहेत. जमा—खर्चाचा ताळमेळ घालताना कसरत करावी लागत आहे. मात्र, तातडीची कामे तत्काळ मार्गी लावण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे खुलासा केला. पुष्पा पर्वतराव यांनी, विकासकामे अधिकार्‍यांच्या कामांबाबत शंका व्यक्‍त केली. त्याचबरोबर मनपाच्या स्थावर मालमत्तांतून मिळणार्‍या महसुलातून एंटरप्राईजेस निधीतील कामांबाबत शंका उपस्थित करताना सीओडी चौकशीची मागणी केली. 

सत्ताधार्‍यांची बोटचेपी भूमिका

बेळगाव : प्रतिनिधी

दरम्यान, इतिवृत्त वाचन करून कायम करणाच्या विषयात विरोधी गटाची अधिकारीवर्गाविरोधातील आक्रमकपणा व सत्ताधार्‍यांची बोटचेपी भूमिका सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला. दरम्यान, आयुक्‍त कुरेर यांच्या स्पष्टीकरणानंतर भैरेगौडा पाटील यांनी, आयुक्‍तांच्या स्पष्टीकरणावर नाराजी व्यक्‍त केली.

पंढरी परब यांनी शहरात दोन रेल्वे पुलांचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे शहराची रहदारी व्यवस्था विस्कळीत झाली आहे. त्यामुळे रेल्वे मार्गा शेजारून संपर्क रस्ते बनविण्यात यावे, अशी सूचना मांडली. दिपक जमखंडी यांनी 14  व्या वित्त आयोगातील 6 कोटी रुपये निधी तील कामे, वॉर्ड बजेटमधील तसेच स्मार्ट सिटी  कामांची माहिती अधिकार्‍यांनी घ्यावी, अशी मागणी केली. 

आयुक्‍त कुरेर म्हणाले, शहरातील 12 झोपडपट्टी परिसरात 1 कोटी 87 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.  ई—शौचालये, सार्वजनिक शौचालये व स्वच्छतेची कामी हाती घेण्यात येत आहेत. अ‍ॅक्शन प्लॅन मंजुरीसाठी जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविले आहे.

महापौर व उपमहापौरांचा अधिकारीवर्गावर वचक नसल्याने  मनमानी कामे केली जात आहेत. कपिलेश्‍वर पूल ते बॅ. नाथ पै सर्कल दरम्यानचा मार्ग नो हॉकर्स झोन घोषित करण्याची मागणी जमखंडी यांनी केली.